Police arrested three accused in the murder case of Chandranath Rath, aide to BJP leader Suvendu Adhikari. Sarkarnama
देश

Suvendu Adhikari PA Murder Case : सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, उत्तर प्रदेश, बिहारमधून उचललं!

Chandranath Rath Murder Case Police : सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येप्रकरणात पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली.

Roshan More

PA Murder Case : पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालाच्या काही तासांमध्येच सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ राय यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

सुवेंदू यांनी नुकतीच मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यानंतर चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या तपासाला गती आली आहे. चंद्रनाथ रथ यांच्या हत्ये प्रकरणात तीन संशयित आरोपींना बिहार आणि उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. या विषयीचे वृत्त 'जागरण'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

बंगाल सीआयडीने सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे 10 मे रोजी मयंक राज मिश्रा, विक्की मौर्या यांना बिहारमधील बक्सर येथून ताब्यात घेण्यात आले. तर, राजा सिंह या आरोपीला उत्तर प्रदेशमधील बलिया येथून ताब्यात घेण्यात आले.

संशयित आरोपींनी एका टोल नाक्यावर युपीआयद्वारे पेमेंट केले होते. त्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने त्यांचे लोकेशन ट्रॅक करत त्यांना अटक केली. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येविषयी या आरोपींकडे चौकशी केली जात असून त्यांना रात्रीच पश्चिम बंगालमध्ये आणल्याचे सांगितले जात आहे.

संशयित आरोपींपैकी दोन आरोपी हे बिहारमधील बक्सर येतील राहणार आहेत. तर, तिसरा संशयित हा उत्तर प्रदेशमधील बलिया येथील रहिवाशी आहेत. आरोपींच्या अटकेविषयी पोलिस लवकरच अधिकृत निवेदन जारी करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT