

PM Modi latest news : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना कोरोनासारख्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे लागेल, असे आवाहन केले होते. त्यानंतर आता त्यांनी पु्न्हा एकदा नागरिकांना महत्वपूर्ण आवाहन केले आहे. पुढील वर्षभर लग्नासाठी सोने खरेदी करू नका, अशी विनंती पंतप्रधानांनी केली आहे.
तेलंगणातील एका कार्यकर्मात बोलताना पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील युध्दजन्य स्थितीसह यूक्रेन युध्दाचा उल्लेख करत त्याच्या भारतावर होणाऱ्या परिणामांचीही माहिती दिली. ते म्हणाले, मी लोकांना आवाहन करतो की, पुढील वर्षभर घरात कोणताही कार्यक्रम असो, सोने खरेदी करू नका. परदेशी चलन वाचविण्यासाठी आपल्याला हे करावे लागले.
पूर्वी लोक देशावर संकट आल्यानंतर सोने दान करत होते. पण आता दान करण्याची गरज नाही. पण देशहितासाठी आपण वर्षभर सोने खरेदी करणार नाही, हे निश्चित करावे लागले. आपली देशभक्ती आपल्याला आव्हान देत आहे, ते आव्हान स्वीकारायला हवे, असे आवाहन मोदींनी केले. कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम केले होते. त्याची सवय आपल्याला आता झाली आहे. आता त्याला पुन्हा प्राधान्य देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
मागील दोन महिन्यांनी आपल्या शेजारी युध्द सुरू आहे. त्याचा प्रभाव जगभरातील देशांसह भारतावरही होत आहे. सथ्याच्या स्थितीत परकीय चलन वाचविण्यावर अधिक जोर देण्याची गरज आहे. अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेल खूप महाग झाले आहे. त्यामुळे इंधनाचा संयमाने वापर करण्याचीही आपली जबाबदारी असल्याचे पंतप्रधान म्हणाले आहेत.
युध्दजन्य स्थितीचा उल्लेख करताना मोदींनी जगभरातील पुरवठा साखळीवर झालेल्या गंभीर परिणामांवरही भाष्य केले. ते म्हणाले, मागील पाच-सहा वर्षात सरकारने या स्थितीवर मात करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. जगात खतांच्या एका पिशवीची किंमत सुमारे ३ हजार रुपये एवढी असताना भारतातील शेतकऱ्यांना हेच खत ३०० रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले जात आहे.
भारत विकसित देशाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. पण सध्या भारत अनेक आव्हानांचा सामनाही करत आहे. कोरोना काळानंतर यूक्रेनमध्ये युध्द सुरू झाले. त्यामुळे जगाचा त्रास आणखी वाढला. इंधन, अन्नधान्य आणि खत पुरवठ्यावर परिणाम झाला. शेजारीत देशात सुरू असलेल्या युध्दाने भारतावरही मोठा परिणाम झाला आहे. भारताकडे इंधनाच्या मोठ्या विहिरी नाहीत. आपल्याला पेट्रोल, डिझेल इतर देशातून घ्यावे लागते. युध्दामुळे संपूर्ण देशात इंधनासह खतांचे भाव खूप वाढले आहेत, असे मोदींनी सांगितले.
भारत सरकार मागील दोन महिन्यांपासून देशवासियांवर बोझ पडू नये, यासाठी सरकार सर्व ओझे सरकार आपल्या खांद्यावर उचलत आहे. पण पुरवठा साखळीवर दबाव वाढला तर आपण कितीही प्रयत्न केले तर अडचणी वाढतच जातात. पण आता आपल्याला देशासाठी एकजुट होऊन लढावे लागले. देशासाठी प्राण देणे हीच देशभक्ती नसते. देशासाठी जगणे आणि आपली कर्तव्य पार पाडणे, हेही देशभक्ती असते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.