Bibhav Kumar
Bibhav Kumar Sarkarnama
देश

Swati Maliwal Assault Case : विभव कुमारांना तीस हजारी कोर्टाकडून आणखी एक दणका ; आता दिला 'हा' निर्णय!

Mayur Ratnaparkhe

Swati Maliwal Vs Bibhav Kumar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी मंगळवारी तीस हजारी कोर्टात हजर केले. त्यांची न्यायालयी कोठडी आज संपणार होती. न्यायालयाने 24 रोजी विभव कुमारांना चार दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. त्यानंतर आज सुनावणी झाल्यावर तीन दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे, पोलिसांनी पाच दिवसांची कोठडी मागितली होती. यामुळे विभव कुमार यांना न्यायालयाकडून आणखी एक दणका बसला आहे.

कारण, सोमवारीच तीस हजारी कोर्टाने विभव कुमार(Bibhav Kumar) यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या लेखी तक्रारीनंतर विभव कुमार यांना 18 मे रोजी अटक केली गेली होती.

याप्रकरणी तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी सातत्याने विभव कुमारांवर आरोप केला आहे की, ते चौकशीत सहकार्य करत नाहीत आणि प्रश्नांची सरळ उत्तरंही देत नाहीत. हाही आरोप केला गेला आहे की, त्यांनी जाणूनबुजून आपल्या फोनचा पासवर्ड सांगितला नाही. जो सत्य शोधून काढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. मालीवाल यांनी आरोप केला आहे की, जेव्हा त्या 13 मे रोजी केजरीवालांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहचल्या तेव्हा विभव कुमारांनी त्यांना मारहाण केली.

आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल(Swati Maliwal) यांना मुख्यमंत्री निवासस्थानी कथितरित्या झालेल्या मारहाणीत आणि अपमानस्पद वागणूक प्रकरणावर मुख्यमंत्री केजरीवला यांनी काही दिवसांपूर्वीच मौन सोडले होते. तेव्हा केजरीवाल यांनी म्हटले होते की, त्यांना या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी असे वाटते. न्याय मिळाला पाहिजे, असंही केजरीवालांनी म्हटलं होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT