Swati Maliwal Assault Case : आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal News) यांनी पुन्हा एकदा पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आप नेते आणि त्यांच्या समर्थकांकडून चालवण्यात येणाऱ्या चारित्र्यहनन मोहिमेनंतर आता आपल्याला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच यू-ट्यूबर ध्रुव राठीच्या (Dhruv Rathi News) एकतर्फी व्हिडिओमुळे आपल्याविरोधातील मोहिमेला खतपाणी घातले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मालीवाल यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत हे दावे केले आहेत. त्यांनी म्हटले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी खासगी सचिव विभव कुमार (Bibhav Kumar) यांनी मारहाण केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून विभव यांना अटकही झाली आहे. सध्या दिल्लीच्या राजकारणात (Delhi Politics) हा मुद्दा चांगलाच तापला आहे. (Swati Maliwal Case Latest Update)
मालीवाल यांनी रविवारी अपमानजनक मेसेज आणि बलात्काराच्या धमकीचे स्क्रीनशॉट सोशल मीडियात (Social Media) पोस्ट करत म्हटले आहे की, आपल्याच पक्षातील नेत्यांकडून कथितपणे चारित्र्यहनन करण्यात आले. पक्षाच्या नेतृत्वाकडून विभव कुमारविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राठी हे आपचे प्रवक्ते असल्याचा आरोप करत मालीवाल यांनी केला आहे. राठी यांनी मालीवाल यांच्याविषयी एक व्हिडिओ केला आहे. याबाबत मालीवाल यांनी म्हटले आहे की, मी माझी बाजू राठी यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांनी माझे कॉल आणि मेसेजकडे दुर्लक्ष केले. स्वतंत्र पत्रकार असल्याचा दावा करणारे त्यांच्यासारखे लोक अन्य आप प्रवक्त्यांप्रमाणे काम करू शकतात आणि मला आता धमक्यांचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, मालीवाल यांना मारहाणप्रकरणी आम आदमी पक्षाने त्यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. केजरीवाल यांनीही या प्रकरणावर सावध प्रतिक्रिया देत कुणाचेही समर्थन केलेले नाही. तर मालीवाल यांनीही आतापर्यंत थेट केजरीवाल यांचे नाव न घेता हल्लाबोल केला आहे. आपण खासदारकीचा राजीनामा देणार नसल्याचेही त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.