Arvind Kejriwal, Swati Maliwal Sarkarnama
देश

Swati Maliwal Case : …त्यावेळी केजरीवालांच्या घरी काय झाले? मारपीट कशी झाली? मालीवाल यांनीच दिली माहिती

Bibhav Kumar News : केजरीवालांच्या घरात विभव कुमार यांनी मालीवाल यांना मारहाण केल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे.

Rajanand More

New Delhi News : आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal Case) यांना मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी त्यांचे खासगी सचिव विभव कुमार यांनी मारपीट केल्याचा आरोप आहे. मालीवाल यांनी गुरूवारी पोलिसांना जबाब दिला असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जबाबामध्ये मालीवाल यांनी आपबीती सांगितली आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणीमध्ये मालीवाल यांच्या चेहऱ्याला मार लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

मालीवाल यांच्या जबाबानुसार दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) नोंदवलेल्या ‘एफआयआर’मध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या (Arvind Kejriwal) घरी विभव यांनी कानशिलात लगावली. पोटात मारले आणि लाथही मारली, असे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या वैद्यकीय तपासणीतही मालीवाल यांना मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Political News)

काय आहे 'एफआयआर'मध्ये?

मी काहीही केलेले नसताना त्याने मला मारायला सुरूवात केली. मला कमीत कमी सात-आठ वेळा थोबाडीत मारली. मी मदतीसाठी ओरड होते. मी त्याला पायाने दूर लोटले. तो पुन्हा मला मारायला लागला. माझा शर्ट ओढला. माझे डोके पकडून टेबलवर आपटले. मी वाचण्याचा प्रयत्न करत होते आणि तो पायाने माझ्या पोटात, छातीवर लाथा घालत होता. मी कशीतरी सुटका करून ड्रॉईंग रुममध्ये आले आणि सोफ्यावर बसले. मला खूप मोठा धक्का बसला होता म्हणून मी ११२ क्रमांकावर कॉल करून घटनेची माहिती दिली.

मालीवाल यांनी गुरूवारी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ट्विट करत पहिल्यांदाच घटनेवर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्यासोबत खूपच वाईट झाले. या घटनेबाबतचा जबाब पोलिसांना दिला आहे. त्यावर योग्य कारवाई होईल, अशी आशा आहे. माझ्यासाठी मागील काही दिवस खूप कठीण होते. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, त्यांचे मी धन्यवाद मानते. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी दुसऱ्या पक्षाच्या इशाऱ्यावर हे सर्वकाही करत असल्याचे सांगत काहींनी माझ्या चरित्रावर बोट ठेवले, देवाने त्यांनाही आनंदी ठेवावे. देशात महत्वाची निवडणूक (Election) सुरू आहे. स्वाती मालीवाल महत्वाची नाही, देशातील मुद्दे महत्वाचे आहेत. त्यामुळे घटनेचे राजकारण करू नये, अशी भाजपवाल्यांना खास विनंती असल्याचेही मालीवाल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने विभव कुमार (Vibhav Kumar) यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. त्यांच्या पत्नीने नोटीस घेतली नाही, त्यामुळे घरावर चिटकवली आहे. ते चौकशीला हजर न झाल्यास आमची टीम घरी जाऊन चौकशी करेल, असेही महिला आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केजरीवाल यांनी या घटनेवर एकदाही भाष्य न केल्याने भाजपकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT