​Tahawwur Rana's Role in the 2008 Mumbai Terror Attacks​  Sarkarnama
देश

Tahawwur Rana Case : 26/11 च्या मास्टरमाईंडला फासावर लटकवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल; नरेंद्र मान यांच्या खांद्यावर जबाबदारी

​Narender Mann Appointed as Special Public Prosecutor in 26/11 Case​ : तहव्वुर राणा विरोधातील केस पूर्ण ताकदीने कोर्टात लढण्यासाठी सरकारने नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Rajanand More

New Delhi News : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला आज (ता. 10) भारतात आणले जाणार आहे. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्याला कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत तिहार जेलमध्ये नेले जाणार आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा ठोठवण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

तहव्वुर राणा विरोधातील केस पूर्ण ताकदीने कोर्टात लढण्यासाठी सरकारने नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वतीने कोर्टात बाजू मांडतील. या केसमधील डेविड कोलमैन हेडली हाही आरोपी आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचे षडयंत्र रचल्याचा दोघांवर आरोप आहे.

राणाला भारतात आणल्यानंतर नरेंद्र मान हे त्याच्या विरोधातील प्रकरणांच्या सुनावणीला दिल्लीतील विशेष न्यायालय आणि संबंधित अपीलीय न्यायालयांमध्ये सरकाराची बाजू मांडणार आहेत. त्यांच्या पुढील तीन वर्षांसाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे. या केसचा निकाल त्याआधीच लागल्यास तोपर्यंत ही नियुक्ती असेल.

कोण आहेत नरेंद्र मान?

नरेंद्र मान हे प्रसिध्द वकील असून अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी सीबीआयसाठी अनेक हायप्रोफाईल केस लढल्या आहेत. त्यामध्ये 2018 च्या कर्मचारी निवड आयोगाच्या पेपर लीक केसचाही समावेश आहे. अनेक केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून यापूर्वीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने मान यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. 

दरम्यान, मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणाला भारतात आणण्यासाठी सरकारकडून खूप प्रयत्न करण्यात आले. त्याला यश आले असून एनआयएचे पथक विशेष विमानाने राणाला भारतात घेऊन येत आहे. आज दिल्ली विमानतळावर हे विमान उतरणार असून त्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राणाला तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यात आला आहे. तिथेही सीसीटीव्हीसह कडक सुरक्षाव्यवस्था असणार आहे. अमेरिकेतील न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच राणाच्या भारताला प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केले होते. त्याविरोधात राणाने कोर्टात याचिका दाखल केली होती. पण ती फेटाळण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT