US-China Tariff War : चीन-अमेरिकेत 'टेरिफ'चा भडका! ट्रम्प यांच्या 104 टक्के टेरिफला चीनंच जशास तसं उत्तर; लादला तब्बल 'इतके' टक्के आयात कर

Donald Trump Tariff Policy : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे जगभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका जगासह अमेरिकेला देखील भोगावा लागणार आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील जनता देखील रस्त्यावर उतरली आहे.
Donald trump, Xi Jinping
Donald trump, Xi JinpingSarkarnama
Published on
Updated on

Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे जगभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका जगासह अमेरिकेला देखील भोगावा लागणार आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील जनता देखील रस्त्यावर उतरली आहे.

ट्रम्प (Donald Trump) यांच्या मनमानी कारभारामुळे अमेरिकेसह जगाची वाटचाल मंदीकडे होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. मात्र, तरीही ट्रम्प आपलं टेरिफ धोरण मागे घेण्याऐवजी आणखी तीव्र करताना दिसत आहेत. कारण नुकतंच त्यांनी चिनी आयात मालावर तब्बल 104 टक्के शुल्क लादलं आहे.

Donald trump, Xi Jinping
Rahul Gandhi latest news : ''भाजप अन् 'RSS'ला फक्त काँग्रेसच रोखू शकते बाकी पक्ष नाही, कारण...'' ; राहुल गांधींचं मोठं विधान!

त्यांच्या या निर्णयामुळे चीन आणि अमेरिकेत व्यापारी युद्धाचा भडका उडू शकतो, असी शंका अनेकांनी वर्तवली होती. ते आता प्रत्यक्षात घडताना दिसत आहे. कारण, डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सुरूवातीला 34 टेरिफ लावला. त्यानंतर चीनने देखील अमेरिकच्या वस्तूंवर 34 टक्के आयात शुल्क लावत चीनला झटका दिला होता.

त्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा चीनवर तब्बल 104 टक्के आयात शुल्क लादलं. त्यानंतर आता चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर 84 टक्के वाढीव आयात कर लादण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. चीनचा हा निर्णय ट्रम्प यांना चांगलाच झोंबला आहे. त्यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये व्यापारी युद्धाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळत असून याचे अनेक विपरीत परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात.

Donald trump, Xi Jinping
Utpal Parrikar : मनोहर पर्रीकरांचे पुत्र भाजपच्या वाटेवर? ; म्हणाले ''तिकीट कापले म्हणून पक्ष...''

दरम्यान, चीनच्या अर्थ मंत्रालयाने एक निवेदन जारी करत म्हटलं आहे की, चीनवर अमेरिकेने लादलेले वाढीव शुल्क ही एक चूक आहे. हा निर्णय चीनच्या कायदेशीर हक्कांचं आणि हितांचं उल्लंघन करत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तर चीनने लागू केलेल्या वाढीव 84 टक्के आयात शुल्कावर आता ट्रम्प काय निर्णय घेणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com