
Donald Trump Trade War News : जगभरातील 70 देशांच्या विनंतीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुचर्चित आयातशुल्क वाढीच्या निर्णयाला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे. त्याचवेळी चीनवर मात्र 125 टक्के वाढीव आयातशुल्क कायम राहणार असल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर केले. ट्रुथ' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांनी याबाबतची घोषणा केली.
ट्रम्प यांच्या आयातशुल्क वाढीला स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे जागतिक आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम दिसून आले. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री बाराच्या सुमारास अमेरिकी शेअर बाजाराचे व्यवहार सुरू झाल्यावर तिथे ट्रम्प यांच्या या घोषणेचे सकारात्मक पडसाद उमटले. तर दोलायमान झालेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला यामुळे दिलासा मिळणार आहे. मंदीचे सावटदेखील बऱ्याच अंशी दूर होईल, असे मानले जाते.
चीनवरील 125 टक्के वाढीव आयात शुल्क कायम ठेवल्याने ट्रम्प यांचा अद्यापही चीनवर असल्याचे स्पष्ट होते. चीनच्या मनामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेप्रती फारशी आदराची भावना नाही, त्यामुळे त्यांच्यावर जबर आयातशुल्क आकारणे योग्य असल्याचे म्हणत त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले.
चीननेही अमेरिकेला जशास तसे उत्तर दिले आहे. चीनने अमेरिकन वस्तूंवर 84 टक्के वाढीव आयात कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. आता या दोन्ही देशांमध्ये व्यापारी युद्धाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळत आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या अनपेक्षित निर्णयांसाठी ओळखले जातात. त्यांचा टॅरिफ लागू करण्याचा निर्णय देखील असाच धक्कादायक मानला जात होता. पण या निर्णयानंतर त्यांच्याशी 70 देशांनी चर्चा केली. याशिवाय त्यांच्या इतर निर्णयांवरही अमेरिकेचे नागरिक नाराज आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणे, एलजीबीक्युटी समुदायाविरोधातील अध्यादेश, स्थलांतरितांना देशाबाहेर काढणे, सामाजिक सुरक्षा विभाग बंद करणे अशा निर्णयांचा निषेध केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.