New Delhi, 12 May : भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामनंतर सुरू असलेल्या विविध चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 12 मे) देशातील जनतेला उद्देशून भाषण केले. त्यात त्यांनी ‘पाकिस्तानबरोबर केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर’ या मुद्यावरच चर्चा होईल, असे जगाला ठणकावून सांगितले. हे सांगताना त्यांनी ‘पाणी आणि रक्त एकाचवेळी वाहू शकत नाही,’ असेही स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले, की दहशतवादाच्या लढाईत एकजूट आणि एकता ही आमची सर्वांत मोठी शक्ती आहे. हे युग युद्धाचे नाही. पण, दहशतवाद्यांचेही नाही. दहशतवाद्यांच्या विरोधात झीरो टॉलरन्स ही सुरक्षित जगाची ग्यारंटी आहे.
पाकिस्तानचे (Pakisatan) लष्कार, सरकार ज्या पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालत आहे. ते असेच सुरू राहिले, तर एक दिवस हाच दहशतवाद पाकिस्तानला खत्म केल्याशिवाय राहणार नाही. यातून पाकिस्तानला वाचायचे असेल, तर आपल्या भूमीवरील दहशतवादी अड्डे त्यांना उद्ध्वस्त करावेच लागतील. याशिवाय शांतीचा कोणताही मार्ग नाही, असेही मोदी यांनी ठणकावले.
मोदी म्हणाले, भारताचे मत एकदम स्पष्ट आहे की, दहशतवाद आणि बोलणी एकावेळी होऊ शकणार नाही. दहशतवाद आणि व्यापार बरोबर चालू शकत नाहीत. पाणी आणि रक्त एकाचवेळी वाहू शकत नाही. मी आज विश्वसमुदायाला सांगू इच्छितो की, आमची घोषित नीती आहे.
पाकिस्तानबरोबर केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर या मुद्यावरच चर्चा होईल. भगवान बुद्धांनी आम्हाला शांतीचा मार्ग दाखवला आहे. मानवता, शांती आणि समृद्धी सोबत चालेल. प्रत्येक भारतीय शांतीपूर्ण वातावरणात जगतील. विकसित भारतासाठी शक्तीशाली भारताची गरज आहे. आवश्यकता पडल्यास या शक्तीचा वापर करणे गरजेचे असते. गेल्या काही वर्षांत भारताने हेच केले आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.