
Navi delhi News : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केली. ज्यात पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने भारतावर 400 हून अधिक ड्रोन डागले. मात्र भारतीय लष्कराने दिलेल्या प्रतित्युरामुळे पाकिस्ताचे तीन दिवसांतच कंबरडं मोडल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. ते ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पहिल्यांदाच देशाला संबोधित करत होते.
यावेळी मोदींनी, पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना, दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये धर्म विचारून हत्या केली. फक्त हत्याच केली नाही. तर पर्यटकांना त्यांच्या कुटुंबासमोर, मुलांसमोर निर्घृणपणे ठार मानले. दहशतवादाचा हा बीभत्स चेहरा होता. दहशतवाद्यांचा हा प्रयत्न क्रौर्य, देशाची सद्भवना तोडण्याचा होता. पण आपल्या देशाचं सामर्थ्य आणि संयम दोन्ही जगानं पाहिलं. आपल्या सैन्यदलांना मी सॅल्युट करतो. मी देशाच्या प्रत्येक मातेला आणि भगिनींना हा पराक्रम अर्पित करतो, असे मोदींनी म्हटलं आहे.
दहशतवादाचा या चेहऱ्याविरोधात लढण्याची मागणी विरोधी पक्षासह देशातील नागरीकांची होती. त्या प्रमाणे पाकिस्तानला उत्तर देण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर हे फक्त नावच नाही. तर देशाच्या कोटी कोटी जनतेच्या भावनांचं प्रतीक आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. 6 मे च्या रात्री उशिरा, 7 मेच्या पहाटे ही प्रतिज्ञा पूर्ण होताना देशाने आणि जगाने पाहिलं आहे. भारताच्या सैन्यदलांनी पाकिस्तानात दहशतवादी अड्डे, त्यांच्या ट्रेनिंग सेंटर्स उडवून लावली. जे दहशतवाद्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं.
आम्ही फक्त पाकिस्तानात दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले नाहीत तर भारत विरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादाच्या म्होरक्यांनाही एका झटक्यात संपवलं. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान गोंधळून गेला. या गोंधळातच पाकिस्तानने दुःसाहस केलं. दहशतवादाविरोध करण्याऐवजी पाकिस्तानने भारतावर हल्ले केले.
महाविद्यालयं, सामान्य नागरिकांची घरं, शाळा, गुरुद्वारे, धर्मस्थळं आपल्या सैन्य छावण्यांना पाकिस्तानने लक्ष केलं. यामुळे आज पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला असून त्यांचा बुरखा फाटला आहे. पाकिस्तानचे ड्रोन्स, मिसाईल्स भारताच्या सामर्थ्यापुढे चालली नाहीत. आम्ही त्याच्या हल्ल्याला आकाशातच उत्तर दिलीत. भारताने ड्रोन्स, क्षेपणास्त्रांच्या अचूक हल्ल्याने पाकिस्तानी वायुसेनेच्या हवाई अड्डे उद्ध्वस्त केलं. पहिल्या तीन दिवसांतच पाकिस्तानचं इतकं नुकसान केलं की पाकिस्तानचं कंबरडं मोडलं असेही मोदींनी देशाला संबोधित करताना दवा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.