CM Vijay  Sarkarnama
देश

CM Vijay news : मुख्यमंत्रि‍पदाचा कार्यभार हाती घेताच विजय यांचे 4 धडाकेबाज निर्णय; राहुल गांधींसमोरच स्टॅलिन यांना दिला पहिला झटका

Tamil Nadu new chief minister, Vijay first decisions : तुम्ही मला साथ आणि संधी दिली तर मी दिलेल्या सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असेही विजय यांनी शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या त्यांच्या चाहत्यांना उद्देशून म्हटले.

Rajanand More

TVK government news : सुपरस्टार सी. जोसेफ विजय यांनी अखेर रविवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेत इतिहास घडविला. तब्बल सहा दशकांनंतर तमिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयडीएमके या दोन पक्षांशिवाय तिसऱ्या पक्षाची सत्ता राज्यात आली आहे. त्यामुळे विजय यांचा शपथविधी सोहळा ऐतिहासिक ठरला. त्यानंतर विजय यांनी पदाची शपथ घेताच चार धडाकेबाज निर्णय घेत आपल्या कामाची चुणूकही दाखविली.

विजय यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात दिलेले पहिले आश्वासन पूर्ण केले. राज्यात २०० यूनिटपर्यंत मोफत वीज पुरवठ्याच्या फाईलवर त्यांनी पहिली सही केली. त्यानंतर त्यांनी महिला सुरक्षेसाठी विशेष दल स्थापन करण्याचा निर्णयही घेतला. त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्जविरोधी युनिट सुरू करण्याचा प्रस्तावही त्यांनी मंजूर केला.

विजय यांनी ही तिन्ही आश्वासने आपल्या जाहीरनाम्यात दिली होती. पहिल्याच दिवशी त्यांनी तीन मोठे निर्णय घेत नागरिकांची मने जिंकली. त्याचवेळी त्यांनी मागील डीएमके सरकारला झटकाही दिला आहे. द्रमुकचे सर्वेसर्वा एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्री असतानाच्या २०२१ ते २०२६ या काळातील राज्याच्या आर्थिक स्थितीचा व्हाईट पेपर काढणार असल्याचे विजय यांनी जाहीर केले. यावेळी व्यासपीठावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीही होते. काँग्रेसने विजय यांना पाठिंबा दिल्याने डीएमकेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे विजय यांना सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिलेल्या काँग्रेससह डावे पक्ष, व्हीसीके, आययूएमएल हे पक्ष द्रमुकसोबत होते. त्यामुळे विजय यांच्या या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. आपल्या पहिल्याच भाषणात विजय यांनी डीएमके सरकारवर आरोप करताना म्हटले की, डीएमके सरकार आपल्यासाठी दहा लाख कोटींची तूट ठेऊन गेले आहे. त्यांनी माझ्यावर हा बोझा टाकला आहे.

तुम्ही मला साथ आणि संधी दिली तर मी दिलेल्या सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असेही विजय यांनी शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या त्यांच्या चाहत्यांना उद्देशून म्हटले. शिक्षण, अन्नपुरवठा, आरोग्य आणि महिला सुरक्षा यावर आपले प्राधान्याने लक्ष असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाच मित्रपक्षांसह सत्तेत आलेल्या विजय यांनी राज्यात केवळ एकच सत्ताकेंद्र असेल असे ठणकावून सांगितले. प्रशासन आपल्याच नेतृत्वाखाली काम करेल, असे सांगत त्यांनी इतर पक्षांनाही सावध करण्याचा प्रयत्न केला. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगताना त्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली, आरोप केले, तीही माझीच माणसे असल्याचे म्हणत उपस्थितांची मने जिंकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT