Vijay challenges Governor and central government Sarkarnama
देश

Tamil Nadu Anthem Controversy : पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी; विजय यांनी थेट राज्यपाल अन् केंद्र सरकारलाच दिले आव्हान

Thalapathy Vijay statement on anthem issue : केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी सरकारी कार्यक्रमांसाठी वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि राज्य गीत असा क्रम निश्चित केला आहे.

Rajanand More

BJP vs Vijay: तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून विजय यांनी सोमवारी शपथ घेतली. पण आता थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर काही तासांतच विजय यांना पाठिंबा दिलेल्या पक्षांची नाराजी समोर आली आहे.

शपथविधी सोहळ्यात तमिळनाडूचे प्रार्थना गीत वंदे मातरम् आणि राष्ट्रगीतानंतर गाण्यात आले. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. तसेच राज्यपाल आणि नव्या सरकारने वादाची पहिली ठिणगी पडल्याचीही चर्चा आहे.

मित्रपक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर विजय यांच्या टीव्हीके पक्षाने लगेच त्यावरून थेट केंद्र सरकारच्या आदेशाला आव्हान दिले आहे. व्हीसीकेला सत्तेसाठी पाठिंबा दिलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि व्हीसीके या पक्षांच्या नेत्यांनी प्रार्थना गीताला तिसरे स्थान दिल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. प्रार्थना गीत हे मागील सरकारने पाडलेल्या प्रथेप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमात सुरूवातीला गायला हवे, असे या पक्षांचे म्हणणे आहे.

व्हीसीकेने विजय यांच्या पहिल्या भाषणातील एका मुद्द्यावरून कानउघाडणी केली आहे. मागील सरकारने आपल्यावर दहा लाख कोटींच्या कर्जाचा बोजा टाकल्याची टीका विजय यांनी केली होती. त्यावर व्हीसीकेने आक्षेप घेतला आहे. मागील सरकारची पाठराखण करताना व्हीसीकेच्या नेत्यांकडून केवळ कर्जाचे मोठे आकडे दाखवून लोकांमध्ये भीती दाखवत आपले राजकीय हित साध्य करून घेण्यासारखे असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

मित्रपक्षांच्या नाराजीनंतर विजय यांच्या पक्षाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पक्षाचे नेते व सरकारमधील मंत्री आधव अर्जुन यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट करत यापुढे प्रार्थना गीत कोणत्याही कार्यक्रमात सुरूवातीला गाण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

हे गीत ऐतिहासिक असून सरकारने त्याला राज्यगीत म्हणून घोषित केले आहे. हे अत्यंत प्रतिष्ठित गीत असून सरकारी कार्यक्रमांसह सर्व कार्यक्रमांमध्ये सुरूवातीलाच गायले जात, असे मंत्र्‍यांनी म्हटले आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत गायले जाते. ही सर्वसाधारण योग्य आणि परंपरा आहे. या परंपरेला नव्या सरकारचीही असहमती नाही. राज्यपालांकडे याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, 'आपण केंद्र सरकारच्या नव्या परिपत्रकानुसार काम करू.' अपरिहार्य स्थितीमुळे राज्य गीत शेवटी गायले गेले. भविष्यात या नव्या प्रथेचे पालन केले जाणार नाही. आधीच प्रथेनुसारच आधी राज्य गीत गायले जाईल, असे आधव अर्जुन यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नव्या सरकारच्या या भूमिकेमुळे राज्यपाल आणि सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी सरकारी कार्यक्रमांसाठी वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि राज्य गीत असा क्रम निश्चित केला आहे.

मात्र, आता विजय यांच्या सरकारला तो क्रम मान्य नसल्याने त्यांनी राज्यपालांसह केंद्र सरकारलाही एकप्रकारे आव्हान दिल्याची चर्चा आहे. मागील सरकारच्या काळातही यावरून राज्यपालांसोबत टोकाचे वाद झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT