Narendra Modi appeal impact : PM मोदींच्या आवाहनाचे काही तासांतच पडसाद; शेअर बाजाराने दाखविला रेड सिग्नल...

Stock market fall India : शेअर बाजारात घसरणीसोबतच डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही घसरण झाली. सुरूवातीलाच रुपया ४० पैशांनी घसरला.
Trading activity at the Indian stock market after Narendra Modi appealed to citizens to avoid gold purchases and unnecessary foreign travel, leading to investor concerns over economic conditions.
Trading activity at the Indian stock market after Narendra Modi appealed to citizens to avoid gold purchases and unnecessary foreign travel, leading to investor concerns over economic conditions.Sarkarnama
Published on
Updated on

Indian share market today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना महत्वाचं आवाहन केलं. पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, परदेशात प्रवास टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर बेताने करा, असे मोदी म्हणाले. त्यावरून विविध क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता मोदींच्या या आवाहनाचे पडसाद शेअर बाजारातही उमटले आहेत.

शेअर बाजार उघडताच पंतप्रधानांच्या आवाहनाला रेड सिग्नल दाखविला आहे. बाजाराची सुरूवातच नकारात्मक झाली. निफ्टी २५० अंकांनी खाली गेला. तर सेंसेक्स एक हजार अंकांनी कोसळला. शेअर बाजारातील या घसरणीमागे मोदींच्या आवाहनासोबतच इराण युध्दावर तोडगा काढण्याचे प्रयत्न फोल ठरत असल्याचे कारणही आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या शांती वार्ताचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

अमेरिकेच्या भूमिकेमुळे कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढलू लागल्या आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे. सोमवारी गोल्ड स्टॉक्समध्ये सुरूवातीला ९ टक्क्यांची घसरण झाली. तसेच इंटरग्लोब एव्हिएशनचे शेअर्सही सुरूवातीलाच ४ टक्क्यांनी घसरले. पंतप्रधान मोदींनी सोने खरेदी न करण्याचे आणि परदेशी प्रवास टाळण्याचे आवाहन केल्याचा हा परिणाम असल्याची चर्चा आहे.

Trading activity at the Indian stock market after Narendra Modi appealed to citizens to avoid gold purchases and unnecessary foreign travel, leading to investor concerns over economic conditions.
CM Vijay update : बहुमत सिध्द करण्याआधीच विजय यांनी एक मतदारसंघ सोडला, एका आमदाराचे पदही धोक्यात

शेअर बाजारात घसरणीसोबतच डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही घसरण झाली. सुरूवातीलाच रुपया ४० पैशांनी घसरला. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने रुपया कमजोर झाल्याचे चित्र आहे. कच्च्या तेलाच्या दरात सुमारे पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आता देशातील पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Trading activity at the Indian stock market after Narendra Modi appealed to citizens to avoid gold purchases and unnecessary foreign travel, leading to investor concerns over economic conditions.
West Bengal political controversy : ममता बॅनर्जींनी निलंबित केलेल्या नेत्याच्या दाव्याने बंगाल हादरले; म्हणाले, 'त्या' रात्री 5 हजार कार्यकर्त्यांची हत्या झाली असती...

काय म्हणाले होते पंतप्रधान?

- वर्षभर कोणत्याही कार्यक्रमासाठी सोने खरेदी करणे टाळा.

- सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करा.

- परदेशी प्रवास करू नका.

- पेट्रोल-डिझेलचा नियंत्रित वापर करा.

- वर्क फ्रॉम होम करा.

- इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा.

- खाद्यतेलाचा वापर कमी करा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com