Tamil Nadu Election result 2026; Thalapathy Vijay and Prashant Kishor  sarkarnama
देश

Thalapathy Vijay victory : “तमिळनाडूत धोनीपेक्षा मी लोकप्रिय होणार”, थलपतीच्या विजयाने प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरली

Prashant Kishor Prediction on Thalapathy Vijay Tamil Nadu Election result 2026 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत असतानाच अवघ्या दोन वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Aslam Shanedivan

  1. तामिळनाडूत विजय यांच्या टीव्हीके पक्षाची जोरदार आघाडी

  2. प्रशांत किशोर यांनी वर्षभरापूर्वी केलेले भाकीत चर्चेत

  3. पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे संकेत

Tamil Nadu Election Result : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत असतानाच तमिळनाडूत थलपती विजय याने राजकारणात जोरदार भूकंप केला आहे. त्याच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करत १०५ जागांची निर्णायक आघाडी घेतली. मात्र अद्याप बघुमत मिळालेले नाही. अशातच बिहारमधील जनसुराज्यचे प्रमुख आणि प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी थलपती विजय याच्या विजयाचे भाकीत केले होते. तसेच जर तसे झाले तर आपण तामिळनाडूमध्ये धोनीपेक्षा जास्त लोकप्रिय ठरू असेही ते म्हणाले होते. आता त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा होऊ लागली आहे.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत दुपारनंतर आता सर्व राज्यातील चित्र जवळपास स्पष्ट झाले. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरी येथे भाजपने सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. केरळमध्ये डाव्यांची सत्ता काँग्रेसने उलथवून लावली आहे. तर तमिळनाडूत थलपती विजयने जोरदार मुसंडी मारत बहूमताची निर्णायक आघाडी घेतली आहे. अद्याप येथे निकाल घोषित करण्यात आलेला नाही.

दरम्यान, आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय असू शकतील अशा चर्चा रंगल्या आहेत. तोच आता प्रशांत किशोर यांचे एका विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तामिळनाडूचे बरेच लोक एम.एस. धोनीला ओळखतात. जो माझ्यापेक्षा जास्त लोकप्रियता असलेला एकमेव बिहारी आहे. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा टीव्हीके जिंकण्यासाठी मी मदत करेन, तेव्हा धोनीपेक्षा जास्त लोकप्रिय मी होऊन, असे ते म्हणाले होते.

आता थलपती विजय यांचा टीव्हीके विजयाच्या दिशेने वाटचाल करत असून विधानसभेच्या २३४ पैकी जागांपेकी तब्बल १०५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर राज्यातील विरोध असणारे एडीएमके ५५ आणि डिएमके पक्षाने ५४ जागांवर आघाडीवर आहे. टीव्हीकेला १०० हून अधिक जागा मिळतील असे कोणत्याच एक्झिट पोलमध्ये शक्यता वर्तवण्यात आली नव्हती. मात्र प्रशांत किशोर यांनी वर्षभराच्या आधीच तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता.

त्यांना, विजय यांचा पक्ष यशस्वी होईल का असा सवाल करण्यात आला होता. ज्याचे उत्तर देताना किशोर यांनी निश्चितच विजय सत्तेच्या जवळ पोहोचू शकेल असे म्हटले होते. पण त्यासाठी विजय यांनी एकट्याने लढावे लागेल असेही म्हणत हा व्हिडीओ सेव्ह करुन ठेवा आणि निकाल लागल्यानंतर पुन्हा दाखवा असा दावा केला होता. आता त्यांचा हा दावा खरा ठरल्याची चर्चा तामिळनाडूमध्ये होताना दिसत आहे.

FAQs :

1. तामिळनाडूत कोण आघाडीवर आहे
विजय यांचा टीव्हीके पक्ष आघाडीवर आहे

2. प्रशांत किशोर यांनी काय भाकीत केले होते
विजय यांच्या यशाचे भाकीत त्यांनी वर्षभरापूर्वी केले होते

3. कोणता व्हिडिओ व्हायरल होत आहे
प्रशांत किशोर यांचा विजयबाबतचा जुना व्हिडिओ

4. पश्चिम बंगालमध्ये कोण आघाडीवर आहे
भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे

5. या निकालांचा काय परिणाम होऊ शकतो
देशातील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडू शकतो

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT