

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापले असताना भाजप खासदार 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी (Hema Malini) यांनी मोठं विधान केलं आहे. अभिनेता, राजकीय नेता, TVKचे सर्वेसर्वा विजय (Vijay) यांच्या विजयावर प्रतिक्रिया देताना हेमा मालिनी यांनी तमिळनाडूचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत भाष्य केले आहे.
हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. “पुडुचेरीमध्ये भाजपचा विजय हा चांगल्या प्रशासनाचं प्रतीक आहे. तमिळनाडूत मात्र जनतेने दशकानुदशके चालत आलेल्या द्रविड वर्चस्वाला नकार दिला आहे. तरुण मतदारांनी मोठ्या प्रमाणात विजय यांना साथ दिली, असे टि्वट त्यांनी केले आहे.
“तमिळनाडूत यापूर्वी M. G. Ramachandran आणि J. Jayalalithaa यांसारखे चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मुख्यमंत्री झाले आहेत. आता विजयही त्या मार्गावर आहेत. ते तमिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, असा विश्वास हेमा मालिनी यांनी व्यक्त केला आहे.
तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने 2026 च्या निवडणुकीत दमदार कामगिरी करत पारंपरिक पक्षांना मोठं आव्हान दिलं आहे. विशेषतः युवा मतदारांनी विजय यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं दिसून आलं आहे.
विजय यांच्या या यशानंतर अनेक कलाकारांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. साउथ स्टार नानी, बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या, तर अभिनेत्री तृषा कृष्णन यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या निकालांच्या पार्श्वभूमीवर विजय यांचे वडील एस.ए. चंद्रशेखर यांनी माझा मुलगा सीएम होणार असे म्हटलं आहे. “मागील ३० वर्षांपासून विजयला समाजासाठी आणि तमिळ जनतेसाठी काहीतरी करायचं होतं. त्याने हळूहळू आपलं स्वप्न साकार केलं आहे. आता माझा मुलगा तमिळनाडूचा मुख्यमंत्री होणार आहे.” असे ते म्हणाले.
तमिळ जनता विजयवर अभिनेता म्हणून जितकं प्रेम करते, तितकंच एक नेता म्हणूनही करते. राज्यातील प्रत्येक महिला विजयला आपला मुलगा मानते, युवक त्याला भाऊ समजतात, तर ज्येष्ठ महिलांसाठी तो नातवासारखा आहे. हे नातं विजयने स्वतः तयार केलं आहे” असे चंद्रशेखर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.