C. V. Shanmugam resignation amid support talks for Vijay has triggered fresh speculation over government formation. (AI Image) Sarkarnama
देश

Tamil Nadu crisis : विजय यांना पाठिंब्यासाठी आग्रह धरणाऱ्या AIADMK खासदाराचा तडकाफडकी राजीनामा; सुमारे 25 आमदारांचे आहे समर्थन

CV Shanmugam resignation, AIADMK latest news : शनमुगन हे आमदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांच्या खासदाकीच्या राजीनाम्याच्या टायमिंगची जोरदार चर्चा रंगली आहे.

Rajanand More

Tamil Nadu political crisis : तमिळनाडूतील सत्तास्थापनेचा तिढा अधिक वाटत चाललेला असतानाच मोठी घडामोड समोर आली आहे. AIADMK पक्षाचे नेत व माजी मंत्री सी. व्ही. शनमुगन यांनी गुरूवारी रात्री राज्यसभा सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यसभेच्या सभापतींकडे राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

AIADMK मध्ये विजय यांना पाठिंबा देण्यावरून दोन गट पडल्याचे सांगितले जात आहे. विजय यांना पाठिंब्यासाठी आग्रही असलेल्या गटाचे नेतृत्व शनमुगन यांच्याकडे आहे. त्यांना सुमारे २५ आमदारांचा पाठिंबा असून सर्व आमदार पुदुच्चेरी जवळील एका रिसॉर्टवर थांबले आहेत. त्यांना भेटण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी गेले होते. त्यावेळी शनमुगन हे दिल्लीत होते. त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपविला.

नेमकं काय कारण?

शनमुगन यांनी उपराष्ट्रपतींकडे राजीनामा सोपविल्यानंतर मीडियाशी बोलताना यावर खुलासा केला. आपण विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तमिळनाडूतील घडामोडींवर भाष्य करण्यास मात्र त्यांनी नकार दिला. शनमुगन हे मयलम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

टायमिंगची चर्चा

शनमुगन हे आमदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांच्या खासदाकीच्या राजीनाम्याच्या टायमिंगची जोरदार चर्चा रंगली आहे. विजय यांना पाठिंब्यासाठी तयार असलेल्या आमदारांचे नेतृत्व शनमुगन करत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याला महत्व प्राप्त झाले आहे. अद्याप त्यांनी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याबाबत जाहीरपणे कोणतेही विधान केलेले नाही. मात्र, सत्तास्थापनेचा पेच सुटला नाही तर ते महत्वाची भूमिका बजावू शकतात, अशी चर्चा आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेला १०८ जागा मिळाल्या आहेत. सत्तास्थापनेसाठी ११८ आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर हा आकडा ११२ पर्यंत पोहोचला असून अजूनही सहा आमदारांची गरज आहे. विजय यांनी दोनदा राज्यपालांची भेट घेतली आहे. मात्र, बहुमता आकडा दाखविल्याशिवाय सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करणार नाही, अशी भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. त्यामुळे हा पेच वाढला आहे. डीएमके सोबत असलेल्या डाव्या पक्षांसह इतर छोट्या पक्षांनी आपली भूमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT