Tamil Nadu political crisis : तमिळनाडूत घडामोडींना वेग; विजय यांना दोनदा परत पाठवलं, आता पलानीस्वामींची राज्यपालांकडे धाव

TVK Vijay news, AIADMK Palaniswami : विजय यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. अद्याप डावा पक्षांसह इतर कोणत्याही पक्षाने पाठिंब्याचे पत्र दिलेले नाही.
Vijay and Edappadi K. Palaniswami remain at the center of the Tamil Nadu political crisis as the race to form the next government intensifies in the state.
Vijay and Edappadi K. Palaniswami remain at the center of the Tamil Nadu political crisis as the race to form the next government intensifies in the state.Sarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu government formation : तमिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकणाऱ्या टीव्हीके पक्षाला राज्यपालांनी अजूनही सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलेले नाही. पक्षाचे प्रमुख विजय यांनी दोनवेळा त्यांची भेट घेतली. मात्र, बहुमत सिध्द करण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याशिवाय आमंत्रित केले जाणार नाही, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता आणखी मोठी घडामोड समोर आली आहे.

विजय यांना राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी बहुमत नसल्याने परत पाठविले आहे. त्यानंतर आता एआयडीएमकेच्या गोटातून महत्वाची बातमी समोर आली आहे. पक्षाचे सरचिटणीस व माजी मुख्यमंत्री इडाप्पडी के. पलानीस्वामी हे राज्यपालांची भेट घेणार आहे. राज्यपालांनी त्यांना भेटीची वेळही दिली आहे.

पलानीस्वामी हे राज्यपालांना भेटणार असल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. ही भेट नेमकी कशासाठी आहे, याबाबत एडीएमकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, राज्यात सत्तास्थापनेचा पेच असतानाच ही भेट होणार असल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहे.

Vijay and Edappadi K. Palaniswami remain at the center of the Tamil Nadu political crisis as the race to form the next government intensifies in the state.
Congress news : काँग्रेसचा संसदेतील आणखी एक खासदार होणार कमी; 66 वर्षांनंतर पहिल्यांदाच बसणार 'असा' झटका, नेमकं काय कारण?

विजय यांना पाठिंबा देण्यावरून एडीएमकेमध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाचे काही आमदार रिसॉर्टमध्ये हलविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे डीएमकेने आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पलानीस्वामी आणि राज्यपाल भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, विजय यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. अद्याप डावा पक्षांसह इतर कोणत्याही पक्षाने पाठिंब्याचे पत्र दिलेले नाही. मात्र, विजय यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करावे, अशी विनंती राज्यपालांना केली आहे. विधानसभेत बहुमत सिध्द करण्याची संधी द्यावी, असे या पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. या पक्षांकडून राज्यघटनेतील तरतुदी आणि मागील काही राज्यांतील उदाहरणे दिली जात आहे.

Vijay and Edappadi K. Palaniswami remain at the center of the Tamil Nadu political crisis as the race to form the next government intensifies in the state.
Governor role in government formation : महाराष्ट्र 2014, मणिपूर 2017, कर्नाटक 2018..! आता तमिळनाडू 2026... राज्यपाल झटका देणार?  

राज्यपाल मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. स्थिर सरकारसाठी बहुमत असणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावरून आता राजकीय वादविवाद सुरू झाले आहे. काँग्रेससह डीएमके व इतर भाजपविरोधी पक्षांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपकडे बोट दाखविले आहे. विजय यांनी शपथ घ्यावी, असे भाजपला वाटत नाही. तसेच विजय यांच्यासोब काँग्रेसची आघाडी होऊ नये, यासाठीही प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com