CM Vijay  Sarkarnama
देश

Tamilnadu Politics: CM विजय यांची धडाकेबाज निर्णयांची मालिका सुरुच! आधीच्या DMK सरकारविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत घेतला मोठा निर्णय

Tamilnadu Politics: आर्थिक स्थितीवरून तत्कालीन ‘द्रमुक’ सरकारवर आरोप, यावर आता ‘टीव्हीके’ सरकारनं श्वेतपत्रिका काढली आहे.

सरकारनामा ब्युरो

TamilNadu Politics: तमिळनाडूतील जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील ‘टीव्हीके’ सरकारने मागील द्रमुक सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मागील सरकारने राज्यावर १३.१८ लाख कोटी रुपयांचे एकूण कर्ज आणि दायित्वे सोडून महसुली तूट ऐतिहासिक पातळीवर नेल्याचा दावा सरकारने केला आहे. अर्थमंत्री मारिया विल्सन यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली असून, त्यात कर्ज आणि दायित्वांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सी. जोसेफ विजय यांनी द्रमुक सरकारवर टीका केली होती. मागील सरकारने सरकारी तिजोरी रिकामी ठेवली असून, राज्याच्या आर्थिक स्थितीवर लवकरच श्वेतपत्रिका काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली.

अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि २०० युनिट मोफत वीज यांसारख्या कल्याणकारी योजनांची घोषणा करताना विजय म्हणाले, ‘‘राज्यावर १० लाख कोटी रुपयांचे कर्ज असून तिजोरी रिकामी आहे.’’ मंगळवारी अर्थमंत्री मारिया विल्सन यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. चालू आर्थिक वर्षात नवीन योजना आणि कार्यक्रम राबवणे सरकारसाठी कठीण असल्याचे संकेत अर्थमंत्र्यांनी दिले आहेत.

अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) एम. ए. सिद्दीकी यांच्या उपस्थितीत सचिवालयात पत्रकारांशी बोलताना विल्सन म्हणाल्या, ‘‘चालू आर्थिक वर्षात नवीन कार्यक्रम राबवण्यासाठी परिस्थिती बिकट आहे. पुढील मार्ग आव्हानात्मक असला तरी तो निराशाजनक नाही. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३.१८ लाख कोटी रुपयांच्या कर्जामध्ये राज्याच्या थकीत कर्जाव्यतिरिक्त वीज आणि परिवहन महामंडळांसारख्या प्रमुख सार्वजनिक उपक्रमांच्या कर्जाचा समावेश आहे. २०२५-२६ पर्यंतच्या १० लाख कोटी रुपयांच्या कर्जामध्ये केवळ बाजार कर्ज आणि संस्थात्मक कर्जाचा समावेश आहे. यामध्ये सार्वजनिक उपक्रम, वैधानिक मंडळे आणि विशेष वाहनांच्या कर्जाचा समावेश नाही.’’

तमिळनाडूवर असे आहे कर्ज

वीज क्षेत्र - २.४७ लाख कोटी रु.

परिवहन मंडळ - ४३ हजार कोटी रु.

नागरी पुरवठा महामंडळ - २१,१८१ कोटी रु.

थकीत कर्ज - १० लाख कोटी रु.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT