

Krishna Ashtikar: ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले असून त्यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश आहे. पण त्यांचे पुत्र कृष्णी आष्टीकर हे सध्या विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेकडून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ही निवडणूक उद्या १८ जून रोजी होणार आहे. त्यामुळं कृष्णा आष्टीकर हे काय निर्णय घेतात? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यानुसार त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोरी केल्यानं आता त्यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांच्याबाबतही लोक प्रश्न उपस्थित करायला लागले आहेत. त्यामुळं उद्या ते विधानपरिषदेच्या निवडणुकीत जिंकून आले तरी पुढे ठाकरेंसोबत राहतील की वडिलांप्रमाणेच ते देखील बंड करतील अशी शंका लोकांमध्ये पाहायला मिळते आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. यापार्श्वभूमीवर स्वतः कृष्णा आष्टीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, वडिलांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर कृष्णा आष्टीकर म्हणाले, "आज मी माझी भूमिका स्पष्ट करु इच्छितो की, मी कालही आघाडीचा होतो मी आजही आघाडीचा आहे आणि उद्याही मी आघाडीचाच राहील. मी उद्धव ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे. मी कालही रिंगणात पाय खोवून तयार होतो आणि मी आजही रिंगणात पाय खोवून तयार आहे"
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ६ खासदार फुटले असून त्यांनी लोकसभेत वेगळा गट स्थापन केला असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत त्यांचं विलीनकरण होणार आहे, याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला मान्यता दिली असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळंच पुढे या गटाचा विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं सांगितलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.