"Congress leader Rahul Gandhi spoke to Tamil Nadu TVK chief Thalapathy Vijay after a tragic stampede at his rally." Sarkarnama
देश

Tamil Nadu politics : राहुल गांधींचं मोठं पाऊल; थेट थलपती विजय यांना फोन, तमिळनाडूत काय घडतंय?

Thalapathy Vijay’s TVK Rally in Tamil Nadu Ends in Tragedy : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घटनेबाबत सोशल मीडियातून दु:ख व्यक्त केले होते. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Rajanand More

Rahul Gandhi’s Phone Call to Thalapathy Vijay After Stampede : तमिळनाडूमध्ये पुढीलवर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. सुपरस्टार थलपती विजय यांच्या राजकारणातील एन्ट्रीमुळे राज्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या रॅलीसाठी प्रचंड गर्दी जमली होती. यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 41 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यावरून राजकारण तापलं असून विजय यांच्यासह राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घटनेबाबत सोशल मीडियातून दु:ख व्यक्त केले होते. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. राहुल गांधी यांनी थेट टीव्हीके पक्षाचे प्रमुख असलेले थलापती यांना फोन केला होता. त्यांच्याशी घटनेबाबत त्यांनी संवाद साधल्याची माहिती काँग्रेस पक्षातील नेत्यांनी दिल्याचे वृत्त आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतच अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये विजय यांच्या चाहत्यांसह इतर सर्वसामान्य नागिरकांचाही समावेश आहे. लहान मुले आणि महिलांचाही मृत्यू झाला आहे. राहुल यांनी विजय यांना फोन करून या घटनेबाबत विचारपूस केल्याचे समजते. तमिळनाडूच्या राजकारणात विजय यांनी राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाविरोधात शड्डू ठोकला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि डीएमकेची आघाडी आहे. त्यामुळे राहुल आणि विजय यांच्यातील संवादानंतर चर्चांना उधाण आले आहे.

राहुल गांधी यांनी स्टॅलिन यांच्याशीही दुरध्वनीवरून संवाद साधला आहे. याबाबत स्टॅलिन यांनीच सोशल मीडियात पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, करूरमध्ये झालेल्या घटनेबाबत राहुल गांधी यांनी आपल्याशी दुरध्वनीवरून बोलताना चिंता व्यक्त केली. तसेच उपचार सुरू असलेल्यांबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी चौकशी केल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, करुर येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज्य सरकारने एक सदस्यीय न्यायालयीन चौकशी समिती नेमली आहे. निवृत्त न्यायमूर्ती या समितीचे प्रमुख आहेत. त्यांच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. त्यामुळे विजय यांना अटक होणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. विजय यांच्या पक्षाने सरकारनेच जाणीवपूर्वक हे घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला आहे.

रॅलीदरम्यान वीज घालविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्याने चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप होत आहे. भाजपनेही राज्य सरकारने गर्दीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घेतली नाही, असा आरोप केला आहे. तर स्थानिक पोलिसांनी विजय यांच्या रॅलीदरम्यान सुचनांचे पालन करण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT