AIADMK News : तमिनाडूचे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेता विजय याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या चार तासांमध्ये एआयडीएमके पक्षात फूट पडल्याचे समोर आले आहे. तब्बल 36 आमदार बंडाच्या तयारीत असून विजय यांना पाठींबा देण्याची शक्यता आहे.
एडीएएमके पक्षाला 47 जागा मिळाल्या आहेत. तर, त्यांच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांना चार जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, एडीएमकेचे नेतृत्व करणाऱ्या पलानीस्वामी याच्यावर आमदारांचा मोठा गट नाराज आहे. या नाराज गटाचे नेतृत्व माजी मंत्री व्ही ष्णमुगम हे करत असल्याचे वृत्त आहे. पलानस्वामी हे एकतर्फी निर्णय घेत असून कोणालाही विश्वात घेत नाही. स्वःच्या हिताचे राजकारण ते करत असल्याचा आरोप बंडखोर आमदारांचा आहे.
निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बंडखोर आमदारांनी विजय यांना पाठींबा देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, पलानस्वामी यांनी विरोधात राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फोडाफोडी होऊ नये म्हणून काही आमदारांना रिसाॅर्टमध्ये ठेवण्यात आले आहे.
बंडखोर आमदारांची संख्या 36 असल्याची माहिती आहे. त्यामुळे व्ही ष्णमुगम हे थेट एडीएमके पक्षावर दावा सांगण्याची शक्यता आहे. पलानस्वामी यांना हटवून एडीएमके व्ही ष्णमुगम ताब्यात घेण्याची शक्यता आहे. तसेच सत्तेतील टीव्हीकेला पाठींबा देण्याची त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे तामिळनाडूचे राजकारण नव्या वळणावर उभे असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.