Tamil Nadu politics : तामिळनाडूत 'रिसॉर्ट पॉलिटिक्स', फोडाफोडीच्या धास्तीने आमदारांना राज्याबाहेर नेलं; सत्तासंघर्ष टोकाला! नेमकं काय घडलं?

Tamil Nadu defection politics : तामिळनाडूतील सत्तासंघर्ष तीव्र झाला असून फोडाफोडीच्या भीतीने आमदारांना राज्याबाहेर हलवण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
Thalapathy Vijay 180 seats claim
Thalapathy Vijay 180 seats claimSarkarnama
Published on
Updated on

तमिळनाडूत झालेल्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अभिनेता विजय यांच्या पक्षाने पहिल्यांदाच निवडणूक लढवत 108 जागांवर विजय मिळवला आणि राज्यातील पारंपारिक पक्षांच्या राजकारणाला आव्हान दिलं. मात्र सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला 118 आमदारांचा आकडा पार करणे शक्य झाले नाही.

विजय थलपती यांनी सरकार स्थापनेचा दावा करण्याची तयारी केली होती. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबतही चर्चा सुरु होती. मात्र, राज्यापाल राजेंद्र आर्लेकर यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 आमदारांच्या समर्थनाची पत्रे मागितली, विजय यांच्या गोटाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांचा दावा अडचणतील आला आणि राज्यातील राजकारण आणखी तापलं.

Thalapathy Vijay 180 seats claim
Bihar cabinet expansion : बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा सस्पेन्स संपला! सम्राट चौधरींच्या 'सेनेत' कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य यादी

दरम्यान, अण्णाद्रमुकमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. काही आमदार विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर पक्ष नेतृत्व सतर्क झाले. त्यानंतर अण्णाद्रमुकने आपल्या नव्या आमदारांना राज्याबाहेरील पुदुचेरी येथील रिसॉर्टमध्ये हलवले. त्यामुळे तामिळनाडूत पुन्हा एकदा ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ चर्चेत आले आहे.

अण्णाद्रमुकचे नेते एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील गट विजय यांच्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही बाजूंमध्ये चर्चाही सुरू होती. मात्र टीव्हीकेकडून स्पष्ट प्रतिसाद न आल्याने अण्णाद्रमुकने सावध भूमिका घेतली. काही आमदार वेगळा गट तयार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आल्यानंतर पक्षाने तातडीने आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला.

Thalapathy Vijay 180 seats claim
West Bengal Election : अमित शाह बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच चक्रे फिरली; भाजपच्या महिला आमदाराला 'दिल्लीतून बोलावणं!

तमिळनाडूतील समीकरण

234 सदस्यांच्या विधानसभेत टीव्हीकेला 108 जागा मिळाल्या आहेत. डीएमकेला 59, अण्णाद्रमुकला 47 जागा मिळाल्या. काँग्रेसला 5, पीएमकेला 4, आययूएमएलला 2, सीपीआयला 2, सीपीएमला 2, व्हीसीकेला 2 तर भाजप, डीएमडीके आणि एएमएमकेला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे सत्तेची गणिते आता छोट्या पक्षांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहेत.

तमिळनाडूतील या घडामोडींमुळे राज्यात पुढे काय होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. विजय इतर छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्ता स्थापनेत यशस्वी होणार का, की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com