Tamil Nadu Crisis : CM पदाचं समीकरण सोडवणाऱ्या थलपती विजय यांना 10 वीत गणिताने फोडला होता घाम!

Thalapathy Vijay TVK party News: सध्या तमिळनाडूत दोनच गोष्टींची चर्चा आहे. एक म्हणजे सरकार स्थापनेची आकडेमोड आणि दुसरी म्हणजे थलपती विजयला दहावीत गणितात किती मार्क होते?
Tamil Nadu Crisis, Thalapathy Vijay TVK party News
Tamil Nadu Crisis, Thalapathy Vijay TVK party NewsSarkarnama
Published on
Updated on

Vijay 10th marksheet News: तमिळ सिनेमात गेली ३० वर्षे बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या ‘थलपती’ विजयने आता राजकारणातही दमदार एन्ट्री केली आहे. २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांच्या TVK पक्षाने तब्बल १०८ जागा जिंकत सगळ्यांचे राजकीय कॅल्क्युलेटरच हँग केले. पण मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मात्र एका मताच्या आकडेमोडीत अडकली. आता सरकार स्थापनेच्या गणिताने TVK ची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

व्हीसीकेच्या दोन आमदार असलेल्या पक्षाने विजय यांना पाठींबा देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे विजय यांचा पक्ष बहुमताच्या जवळ पोहोचला होता. मात्र, आपली भूमिका बदल व्हीसीकेने अजूनही पाठिंबा जाहीर केला नसल्याचे समजते. व्हीसीकेने जाचक अटी घातल्याने विजय यांची कोंडी झाली आहे.दरम्यान सोशल मीडियाने विजयच्या आयुष्यातलं जुनं गणित बाहेर काढलंय… थेट दहावीची मार्कशीट!

होय… सध्या तमिळनाडूत दोनच गोष्टींची चर्चा आहे. एक म्हणजे सरकार स्थापनेची आकडेमोड आणि दुसरी म्हणजे थलपती विजयला दहावीत गणितात किती मार्क होते? कारण पडद्यावर ५० जणांना उडवणाऱ्या विजयला दहावीच्या गणिताच्या पेपरने मात्र चांगलाच घाम फोडल्याचं मार्कशीट सांगतंय.

Tamil Nadu Crisis, Thalapathy Vijay TVK party News
Tamil Nadu VCK Politics: महाराष्ट्राशी नाळ, तमिळनाडूत कमाल; दलित राजकारणाचा नवा चेहरा ‘व्हीसीके’; दोन आमदारांची दमदार एन्ट्री

व्हायरल झालेल्या मार्कशीटनुसार, विजय हे काही टॉपर नव्हते. “पास झाला म्हणजे झालं” अशा कॅटेगरीतले ते विद्यार्थी होते. ११०० पैकी ७११ मार्क म्हणजे साधारण ६५ टक्के विजय यांना मिळाले होते. त्यात गणितात २०० पैकी फक्त ९५ मार्क. म्हणजे आज ज्या आकड्यांसाठी TVK चे नेते रात्रभर कॅल्क्युलेटर घेऊन बसले आहेत, त्याच आकड्यांनी विजयला शाळेतही त्रास दिला होता, अशी सोशल मीडियावर मिश्किल चर्चा सुरू आहे.

Tamil Nadu Crisis, Thalapathy Vijay TVK party News
Maharashtra BJP Reshuffle: भाजपनं भाकरी फिरवली! महाराष्ट्रात नवीन जबाबदाऱ्या निश्चित; राजेश पांडे, निरंजन डावखरे...

पण बाकी विषयांत मात्र थलपतीने बऱ्यापैकी ‘रिकव्हरी’ केली होती. तमिळमध्ये १५५, इंग्रजीत १३३, विज्ञानात २०६ आणि सामाजिक शास्त्रात १२२ गुण मिळवत somehow बोर्ड पार केला आणि पुढे थेट सुपरस्टार बनला.

Tamil Nadu Crisis, Thalapathy Vijay TVK party News
Chandranath Rath: भावी CM च्या सर्वात विश्वासू सहकाऱ्याची हत्या; एअर फोर्स ते राजकारण, कोण होते चंद्रनाथ रथ?

चेन्नईतील कोदंबक्कम आणि विरुगंबक्कम भागातील शाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या विजयने नंतर लोयोला कॉलेजमध्ये व्हिज्युअल कम्युनिकेशनला प्रवेश घेतला. पण कॉलेजचं attendance आणि सिनेमाचं attraction यामध्ये सिनेमानेच बाजी मारली. विजयने कॉलेज सोडलं आणि थेट चित्रपटसृष्टीत एन्ट्री घेतली. पुढे काय झालं हे तमिळनाडूला वेगळं सांगायची गरज नाही.

आता पडद्यावरचा ‘मास हिरो’ राजकारणातही मास लीडर होण्याच्या तयारीत आहे. फक्त एकच प्रश्न बाकी आहे… दहावीच्या गणितात अडकलेला थलपती विधानसभा गणितात पास होणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com