A teacher faces suspension after allegedly participating in a protest organized by the Cockroach Janata Party, sparking political and administrative controversy. sarkarnama
देश

Teacher Suspended : काॅक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी शिक्षिकेचे निलंबन, सरकारच्या निर्णयामुळे धक्का!

Cockroach Janata Party Protest : काॅक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभाग शिक्षिकेचे निलंबन करण्यात आले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या या शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Roshan More

Teacher Suspended News : काॅक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात अनेक जण सहभागी झाले होते. मात्र, या आंदोलनात सहभागी झालेल्या एका शिक्षिकेला आपली नोकरी गमवावी लागली आहे.

दिल्लीत झालेल्या आंदोलनात हरियाणातील रोहतकमधील शिक्षिका सुलेखा दलाल या सहभागी झाल्या होत्या. रोहतकच्या जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी बुधवारी सुलेखा दलाल यांना ८ जूनपासून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र, या आदेशात त्यांच्या निलंबनाचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दलाल या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये त्या म्हणत होत्या की, ही करो या मरोची लढाई आहे. काॅकरोचची आई मैदानात उतरली आहे.आम्ही आमच्या मुलांसोबत आहोत.

सुलेखा दलाल यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. त्यामुळे एक आई म्हणून फक्त विनंती केली होती. दरम्यान, सुलेखा दलाल यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे.

पुण्यात आंदोलन

नीट पेपर फूटीनंतर शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावी, या मागणीसाठी काॅक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीनंतर आज पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत असलेल्या या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT