Uddhav Thackeray: ....कमी समजू नका! उद्धव ठाकरेंचा दिल्लीतल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरुन सरकारला इशारा

Uddhav Thackeray: दिल्लीत सध्या कॉक्रोच जनता पार्टी या चळवळीच्यावतीनं निषेध आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची यात प्रामुख्यानं मागणी करण्यात आली आहे.
Uddhav Thackeray_Cockroach Janata Party
Uddhav Thackeray_Cockroach Janata Party
Published on
Updated on

Uddhav Thackeray: दिल्लीत सध्या कॉक्रोच जनता पार्टी या चळवळीच्यावतीनं निषेध आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची यात प्रामुख्यानं मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. जंतरमंतर मैदानावरुन केंद्र सरकारला हा इशारा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray_Cockroach Janata Party
GenZचा दिल्लीत एल्गार! कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात तरुणांनी काय मांडले मुद्दे; पाहा फोटो

शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे यांची दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरील भूमिका शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटलं की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील तरुणांच्या आंदोलना संदर्भात पुढील निवेदन जारी केले आहे.

Uddhav Thackeray_Cockroach Janata Party
19 MLAs record : कर्जत-जामखेडचे 3, पाच तालुक्यांचे 2-2 आमदार; एकाच जिल्ह्यात 19 आमदार! अहिल्यानगरची राजकीय ताकद शिगेला

“दिल्लीच्या जंतरमंतरवर 'कॉक्रोच'चे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. NEET पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कोक्रोच ना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे"

दरम्यान, ही चळवळ सोशल मीडियातून सुरु झालेली चळवळ असून देशातील सर्वच व्यवस्थांमध्ये सुरु असलेला अनागोंदी कारभार, सरकारचा बेजबाबदारपणा याविरोधात या कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन पुकारलं आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका खटल्यावेळी उठसूठ आंदोलन करणारे, बेरोजगार तरुण, बोगस डिग्री घेऊन वावरणारे यांना कोक्रॉच असा शब्दप्रयोग करत हिनवलं होतं. त्यांच्या याच विधानावर देशभरातून टीका झाली, त्यानंतर सध्या सरकार पुरेसा रोजगार पुरवू शकत नसल्यानं हीच सगळी नामुष्की सहन करत असलेल्या जनरेशन झेड अर्थात जेनझीच्या सहनशीलतेचा कडेलोड झाला आणि त्यातून सरन्यायाधिशांनी ज्या नावानं त्यांना हिणवलं त्याच नावानं आणि सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थीविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी अशा नावानं ही चळवळ सुरु झाली.

Uddhav Thackeray_Cockroach Janata Party
Pune University : चंद्रकांत पाटील यांच्याकडून महाराष्ट्रातील विद्यापीठांचे जाहीर वाभाडे : IIT लेव्हलचे संशोधन करण्यासाठी मार्गदर्शक मंडळाचा प्रस्ताव

अभिजीत दिपके हा या चळवळीचा प्रणेता असून त्यानंच पहिल्यांदा या नावानं ही चळवळ सुरु केली, ज्याच्या इन्स्टाग्राम पेजला पाठिंबा दर्शवण्यासाठी केवळ दोनच दिवसांत एक कोटी फॉलोवर्स झाले. हा प्रत्यक्षात एक मोठा विक्रम असून जगातील सर्वात मोठा पक्ष अशी जाहिरात करणाऱ्या भाजपलाही हे जमलेलं नाही, अशी चर्चा त्यावेळी सुरु होती. ही चळवळ केवळ सोशल मीडियातच गप्पा मारुन विझून जाईल असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं, पण या चळवळीनं प्रत्यक्ष रस्त्यावर उतरत आज दिल्लीत जोरदार आंदोलन करुन दाखवलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com