Maharashtra Teacher  Sarkarnama
देश

Education news : विद्यार्थ्यांना 80 पैकी 40 गुण न मिळाल्यास शिक्षकांची थेट बदली, वेतनवाढ रोखणार! महाराष्ट्रात होणार का असा निर्णय?

Rajasthan education minister, teacher salary increment rule : अनेकदा ८० पैकी १३ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण दाखवून शिक्षक १०० टक्के निकालाचा दावा करतात, अशी नाराजीही शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.

Rajanand More

Teacher transfer rule : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार देशभरातली सरकारी आणि खासगी शाळांमध्ये प्रयत्न केले जात आहेत. विविध राज्यांकडून त्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणावरही भर दिला जात आहे. त्यात महाराष्ट्रही मागे नाही.

भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी याअनुषंगाने नुकतेच मोठे विधान केले आहे. सरकारी शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याला ८० पैकी किमान ४० गुण न मिळाल्यास संबंधित शिक्षकाची चौकशी केली जाईल. गरज भासल्यास या शिक्षकांची वेतनवाढ रोखली जाऊ शकते. तसेच लांबच्या ठिकाणी बदलीही केली जाऊ सकते, असा इशाराच दिलावर यांनी दिला आहे.

सरकारचा उद्देश शिक्षकांवर दबाव टाकण्याचा नसून सरकारी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न असल्याचेही दिलावर म्हणाले. परीक्षांचा एकूण निकाल किती टक्का लागला, हाच निकष शाळेच्या यशाबाबत लावला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

वास्तविकपणे गुणवत्तेवर आवश्यक लक्ष देण्यात आले नाही. अनेकदा ८० पैकी १३ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण दाखवून शिक्षक १०० टक्के निकालाचा दावा करतात, अशी नाराजीही शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.

शिक्षकांकडून १०० टक्के निकाल दाखवत गर्वाने आपले यश दाखवून दिले जाते. मात्र १३ गुण मिळविणारा विद्यार्थी प्रत्यक्षात शिक्षणात खूप मागे असल्याचे दिसते. अशावेळी केवळ टक्केवारीत निकाल दाखविण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्षातील गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज असल्याची अपेक्षा दिलावर यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT