Sanjay Raut news : संजय राऊत प्रगल्भ, अभ्यासू नेते..! थेट केंद्रीय मंत्र्यांकडून सर्टिफिकेट, जुने मित्र म्हणत चार शब्द सुनावलेही...

Ramdas Athawale news : राजकारणात आपण एकमेकांचे विरोधक असू शकतो, पण एकमेकांचा आदर राखण्याचे भान आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आपण सर्वांनीच जपली पाहिजे, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.
Sanjay Raut  Operation Tiger | Shiv Sena MPs Defection |
Shiv Sena leaders and MPs arrive in Delhi amid intense political developments linked to Operation Tiger. The alleged MP defection has sparked fresh debate in Maharashtra politics.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सहा खासदारांनी बंड करत एकनाथ शिंदे पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. या घडामोडी घडत असताना खासदार संजय राऊत यांच्याकडून सहा खासदारांवर शिवराळ भाषेत टीका केली जात आहे. विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना बळ मिळत असल्याचे चित्र आहे.

राऊतांविरोधात शिंदेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी केंद्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. अन्य नेत्यांकडूनही त्यांच्या भाषेचा खरपूस समाचार घेतला जात आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या वादात उडी घेत राऊतांना खडेबोल सुनावले आहेत. त्याआधी त्यांनी राऊतांचे कौतुकही केले आहे.

आठवले यांनी सोशल मीडियात पोस्ट करत सुरूवातीलाच संजय राऊत हे माझे जुने मित्र आहेत आणि एक प्रगल्भ, अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे पक्षामध्ये पडलेली मोठी फूट, सोडून गेलेले खासदार आणि सध्या पक्षाची होत असलेली दयनीय अवस्था पाहता संजय राऊत यांच्या मनात प्रचंड राग आणि नैराश्य असणे हे अगदी साहजिक आहे, असेही आठवले म्हणाले आहेत.

Sanjay Raut  Operation Tiger | Shiv Sena MPs Defection |
भाजप नेत्याचे 54 व्या वर्षी दुसरं लग्न; सांभाळलंय मुख्यमंत्रिपद...

पुढे राऊतांच्या शिवराळ भाषेचा समाचार घेताना आठवले म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाला एक अतिशय सुसंस्कृत आणि वैचारिक परंपरा आहे. पण सध्या संजय राऊत ज्या प्रकारची शिवराळ भाषा वापरत आहेत, परिस्थिती कितीही कठीण असली किंवा मनात कितीही राग असला, तरी वैयक्तिक द्वेषातून कोणाच्याही आई-वडिलांवर चिखलफेक करणे आणि शिवराळ भाषा वापरणे, हे राऊत यांच्यासारख्या प्रगल्भ आणि अभ्यासू व्यक्तीकडून अजिबात अपेक्षित नाही. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आता आत्मपरीक्षण करून संयम आणि राजकीय भान राखण्याची नितांत गरज आहे.

Sanjay Raut  Operation Tiger | Shiv Sena MPs Defection |
Government officials controversy : विश्वास नांगरे पाटलांवरून वाद सुरू असतानाच भाजपच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत; म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर अधिकारी RSS...

या संपूर्ण प्रकारावर उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाने गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्या सहकाऱ्यांकडून वापरली जाणारी ही भाषा आणि वैयक्तिक पातळीवरची चिखलफेक महाराष्ट्रासमोर कोणता आदर्श ठेवत आहे, याचा विचार नेतृत्वाने करायला हवा. राजकारणात आपण एकमेकांचे विरोधक असू शकतो, पण एकमेकांचा आदर राखण्याचे भान आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आपण सर्वांनीच जपली पाहिजे, असे आठवले म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com