Lalu Prasad Yadav Family Sarkarnama
देश

Aishwarya Rai Controversy : ऐश्वर्या रायसोबत महापाप, तरीही लालू गप्प का? एका पोस्टनं राजकीय वादळ...

JD(U) Leader Launches Sharp Attack on Lalu Prasad Yadav : तेजप्रताप यादव यांनी शनिवारी सोशल मीडियात अनुष्का यादव हिच्यासोबतच्या रिलेशनशिपबाबत माहिती दिली होती.

Rajanand More

बिहारमधील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव त्यास कारणीभूत ठरले आहे. त्यांनी आपल्या 12 वर्षांपासूनच्या लव्हस्टोरीची माहिती जाहीर करताच बिहारच्या राजकारणात भूंकप झाला. लालूंनी त्यांची पक्षासह कुटुंबातूनही हकालपट्टी केली. पण आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

तेजप्रताप यादव यांनी शनिवारी सोशल मीडियात अनुष्का यादव हिच्यासोबतच्या रिलेशनशिपबाबत माहिती दिली होती. अनुष्कासोबत 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितले होते. पण चर्चांना उधाण आल्यानंतर काही वेळात त्यांनी ती पोस्ट डिलीट करत आपले अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले.

लालूंनी मात्र ही पोस्ट गांभीर्याने घेत त्यांची तातडीने पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. तर कुटुंबातूनही त्यांना बेदखल केले आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे तेजप्रताप यांचा यापूर्वीच एक विवाह झाला आहे. 2018 मध्ये त्यांचा बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्वर्यासोबत विवाह झाला होता. पण सहा महिन्यांतच तेजप्रताप यांनी घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली होती.

अजूनही दोघांमध्ये घटस्फोट झालेला नाही. त्यामुळे ते दोघेही पती-पत्नी आहेत. तर ऐश्वर्या यांनीही त्यावेळी कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. त्यांनी राबडीदेवी यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर आपला छळ केल्याचा आरोप केला होता. तर तेजप्रताप यांनी आपल्या इच्छेविरोधात हा विवाह झाल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

आता अनुष्का यादवचे प्रकरण समोर आल्यानंतर पुन्हा ऐश्वर्या राय यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संयुक्त जनता दलाचे नेते राजीव रंजन यांनी यात उडी घेतली आहे. लालू यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, लालूजी सगळं प्रकरण वेगळ्या दिशेला नेत आहेत. जेव्हा ऐश्वर्यासोबत महापाप झाले, त्यावेळी त्यांची चेतना जागृत झाली नाही? ही शुध्द अनैतिकता आहे. त्यावर ते गप्प का आहेत? निवडणुकीनंतर तेजप्रतापप पुन्हा पक्षात पत येतील, असे टीका राजीव रंजन यांनी केली आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT