BJP leader Arrested : महामार्गावरच गर्लफ्रेंडसोबत शरीरसंबंध; भाजप नेता अखेर गजाआड; Video झाला होता व्हायरल

BJP Leader Manohar Dhakad Arrested : मनोहर धाकड असे या नेत्याचे नाव आहे. हा नेते मध्य प्रदेशातील मंदसौर येथील आहे. त्यांच्यावर भानपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Manohar Dhakad
Manohar DhakadSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर एका महिलेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नेत्याला अखेर अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला होता. कारमधून उतरत महिलेशी अश्लील चाळे केल्याचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या नेत्यावर गुन्हा दाखल केला होता. हा नेता भाजपशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

मनोहर धाकड असे या नेत्याचे नाव आहे. हा नेता मध्य प्रदेशातील मंदसौर येथील आहे. त्यांच्यावर भानपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले होते. हा प्रकार 13 मे रोजी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे वरील असल्याचे सांगितले जात आहे.

धाकड याची पत्नी मंदसौर जिल्हा पंचायतीची भाजप समर्थिक सदस्य आहे. भाजपने मात्र धाकड आपल्या पक्षाचा सदस्य नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, धाकडच्या एक्सप्रेस वेवरील व्हिडीओने खळबळ उडाली होती. महामार्गावरून तो कारमधून गर्लफ्रेंडसोबत जात होता. अचानक भानपुरा परिसरात कार थांबवून ते दोघे खाली उतरतात. रस्त्यावरच तो मैत्रिणीसोबत शारिरीक संबंध ठेवतो.

Manohar Dhakad
राजकारणात खळबळ उडवून देणारी लव्हस्टोरी; 12 वर्षे कुणालाच नव्हता थांगपत्ता...

धाकडचे हे कृत्य महामार्गावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. धाकड हा धाकड युवा महासभेचा राष्ट्रीय मंत्रीही होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला तातडीने पदावरून हटविण्यात आले. धाकडसह त्याच्या मैत्रिणीवरही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manohar Dhakad
Lalu Prasad Yadav : रिलेशनशिपच्या पोस्टने हादरलेल्या लालूंचा सर्वात मोठा निर्णय; मुलाची कुटुंबासह पक्षातूनही हकालपट्टी

या घटनेनंतर आरोपी धाकड फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी काही पथके नेमत तपास सुरू केला होता. रतलाम विभागामाचे डीआयजी मनोज सिंह यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे अश्लील चाळे करणे बेकायदेशीर आहे. हा सामाजिक मर्यादेचा भंग असून कायद्याचेही उल्लंघन असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com