Telangana Election Sarkarnama
देश

Telangana Exit Polls 2023 : तेलंगणात यंदा सत्ता परिवर्तन? 'KCR' यांची हॅटट्रिक हुकणार, काँग्रेस करणार पुनरागमन!

Mayur Ratnaparkhe

Telangana Exit Polls Result 2023 : तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. यानंतर आता एक्झिट पोल समोर येत आहेत. त्यानुसार यंदा तेलंगणात सत्ता परिवर्तन होणार आहे. केसीआर यांच्या सत्तेला यंदा काँग्रेस आणि भाजपकडून सुरुंग लावल्या गेल्याचे चित्र आहे. एकूण 119 जागा असल्याने बहुमताचा आकडा हा 60 आहे.

या निवडणुकीत यश मिळवत केसीआर यांना सत्ता स्थापनेची हॅटट्रिक करायची होती, तर काँग्रेसला तेलंगणात पुनरागमन करायचे होते. दुसरीकडे भाजपनेही तेलंगणाची सत्ता काबीज करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. याव्यतिरिक्त ओवेसींच्या 'एमआयएम'लाही राज्यातील ताकद वाढवायची होती. यामुळे तेलंगणाची निडणूक सर्वच पक्षांसाठी एकप्रकारे प्रतिष्ठेची बनली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेलंगणात केसीआर यांचे 9 वर्षे सरकार राहिले. 2014 मध्ये तेलंगणा राज्यनिर्मितीनंतर दोनदा विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि दोन्ही वेळेस जनतेने केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला प्रचंड पाठिंबा देत पसंती दिली.

यानंतर 2022 मध्ये के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) असं केले आणि यानंतर आता ते पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेले आहेत. पक्षाचे नाव जरी बदलले असले तरी निवडणूक चिन्ह मात्र जुनेच आहे. तेलंगणात या निवडणुकीत बीआरएस- काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली.

जाणून घेऊया विविध एक्झिट पोलचे निकाल काय सांगतात? -

'जन की बात' : -

बीआरएस - 40-55, काँग्रेस - 48-64, भाजप- 7-13, एमआयएम - 4-7

टीव्ही भारतवर्ष पोल स्टार्ट -

काँग्रेस - 49-59, भाजप- 5-10, बीआरएस 48-58, इतर 6-8

इंडिया टीव्ही-सीएनएक्स -

बीआरएस - 31-47, काँग्रेस - 63-79, भाजप - 2-4, एमआयएम - 5-7

रिपब्लिक टीव्ही मॅट्रीज -

बीआरएस - 46-56, काँग्रेस - 58-68, भाजप -4-9, एमआयएम - 5-7

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT