Chhattisgarh News: देशातील छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, तेलंगणा या पाच राज्यांची विधानसभा निवडणूक 7 ते 25 नोव्हेंबर या कालवधीत पार पडली. या पाचही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला समोर आहे. पण या निकालाआधी आता एक्झिट पोल समोर आले आहेत.
या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये कमळ फुलणार की काँग्रेस, कोणता पक्ष सरकार स्थापन करणार ? याबाबतची उत्सुकता अनेकांना लागली होती. अखेर एक्झिट पोलनुसार आता मोठी माहिती समोर आली असून छत्तीसगडमध्ये भाजपची घरवापसी कठीण असल्याचा अंदाज असून काँग्रेसला काठावरचं बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपचं सत्तेचं स्वप्नं मात्र, भंगणार असल्याची परिस्थिती एकूण एक्झिट पोलनुसार समोर येत आहे.
'पोलस्टार्ट'च्या पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्ता राखण्याची शक्यता आहे, तर भाजपची सत्ता येणं कठीण असून, भाजपला 30 ते 35 जागा मिळण्याची शक्याता आहे, तर काँग्रेसला 40-45 जागा मिळण्याची शक्यता आहे.
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया या पोलनुसार, काँग्रेसला 40 ते 50 जागा तर भाजपला 36 ते 46 जागा तर इतर पक्षांना 1 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.
'इंडिया टीव्ही'च्या पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेसला 46 ते 56 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला 30 ते 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. या बरोबरच इतर पक्षांना 3 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
एबीपी-सी-वोटरच्या पोलनुसार, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला 41 ते 53 जागा तर भाजपला 36 ते 48 जागा, तसेच इतर पक्षांना 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
'आज तक'च्या पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता राखणार आहे. काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 36 ते 46 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच इतर पक्षांना 1 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.
रिपब्लिक-मॅट्रिजच्या पोलनुसार, काँग्रेसला 44 ते 52 जागा तर भाजपला 34 ते 42 जागा व इतर पक्षांना 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
'न्यूज 24 - टुडे चाणक्य'च्या पोलनुसार, काँग्रेसला छत्तीसगडमध्ये 57 जागा तर भाजपला 33 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. छत्तीसगडमध्ये सत्तेच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी 46 जागांचा आकडा आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.