BJP
BJP  sarkarnama
देश

BJP News: तेलंगणात भाजपनं इतिहास घडवला ; शिक्षक मतदारसंघात..

सरकारनामा ब्युरो

Telangana Teachers Constituency: तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवला आहे. नुकत्याच झालेल्या शिक्षक मतदार संघात भाजपचा विजय मिळाला आहे. याबाबत तेलंगणाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

भाजपा प्रदेश अध्यक्ष बंदी संजय म्हणाले, "शिक्षक मतदारसंघातील ही निवडणूक ही सरकारी कर्मचारी आणि शिक्षक वर्गातमध्ये भारत राष्ट्र समितीच्या (BRS) विरोधातील ही लाट आहे. या निवडणुकीतील भाजपचा विजय हा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी भाजपला दिलेली विजयाची पावती आहे,"

तेलगंणामध्ये विधानपरिषदेच्या ४० जागा आहेत, तर विधानसभेच्या १२० जागा आहेत. या राज्यातून १७ खासदार हे संसदेत निवडून जातात. सध्या येथे भारत राष्ट्र समितीचे (BRS) सरकार आहे. के. चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री आहेत.

आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी चंद्रशेखर राव यांनी चळवळ उभारली होती. राज्य निर्मितीनंतर चंद्रशेखर राव यांनी तेलंगणावर पकड बसविली. ‘रयतू बंधू’ या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना दरमहा आर्थिक मदत देण्याच्या सरकारी योजनेमुळे शेतकरी वर्गात चंद्रशेखर राव लोकप्रिय ठरले.

‘दलित बंधू’ योजनाही त्यांना राजकीयदृष्ट्या उपयुक्त ठरली. तेलंगणामधील सिंचन क्षेत्र वाढविण्याकरिता अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली. त्यातून सिंचन क्षेत्र वाढून भाताचे उत्पादन वाढले. तेलंगणाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चंद्रशेखर राव यांच्या विविध योजनांमुळे चालना मिळाली.

तेलंगणात स्थिरस्थावर झाल्याने चंद्रशेखर राव यांची राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान मोदी यांना पर्याय म्हणून स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा बळावली. गेल्या वर्षापासून त्यांचे देशभर दौरे सुरू झाले आहेत. पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती करून देशभरा पक्षाला स्थान मिळावे, असा त्यांचा प्रयत्न आहे.

तेलंगणा राज्यात लोकसभेच्या 17 जागा आहेत. यात अनुसूचित जातींसाठी 3 जागा आणि अनुसूचित जमातींसाठी 2 जागा आरक्षित आहेत. तेलंगणा राज्यातून 7 राज्यसभा खासदार निवडले जातात State मध्ये 120 विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात मागच्या विधानसभा निवडणुका December 2018 मध्ये झाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT