Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारची महिलांसाठी मोठी घोषणा ; आजपासून अंमलबजावणी..

Maharashtra Budget CM Eknath Shinde : जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात.
Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget 2023Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Budget discount for women in state transport CM Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना गुड न्यूज दिली आहे. आजपासून (ता.१७) राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. याबाबतचा आदेश सरकारने काढला आहे. त्यांची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे.

महिला सन्मान योजनेअंतर्गत सरकारने ही घोषणा केली होती. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने आजपासून ( १७ मार्च ) एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम सरकारकडून महामंडळाला मिळणार आहे.

Maharashtra Budget 2023
TMC News : तृणमूल काँग्रेसच्या आमदारांसह अनुब्रत मंडल यांच्या कन्येची पुन्हा ED चौकशी..

राज्य परिवहन महामंडळाकडून याआधीच ही सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात.

एसटी प्रवासातील सवलतीबाबत सरकारने ही घोषणा 9 मार्चला केली होती, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. हा आदेश आज काढण्यात आला. समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्क्यां पर्यंत प्रवासी तिकीट दरात एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकार सवलत देते.

Maharashtra Budget 2023
Amruta Fadnavis News: अमृता फडणवीस शुद्ध-पवित्र, मग 1 कोटींची लाच देणारे तुमच्या स्वयंपाक घरात पोहोचले कसे ?

यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तर 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com