TMC News : तृणमूल काँग्रेसच्या आमदारांसह अनुब्रत मंडल यांच्या कन्येची पुन्हा ED चौकशी..

Anubrata Mandal: सुकन्या मंडल यांनी ईडी कार्यालयाला मेल पाठवून हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता.
Cattle Smuggling Case
Cattle Smuggling CaseSarkarnama
Published on
Updated on

Cattle Smuggling Case : सक्तवसुली संचालनालयाने (ED) पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेसचे नेता अनुब्रत मंडल यांची कन्या सुकन्या मंडल आणि अन्य दोन जणांना पशु तस्करी गैरव्यवहार प्रकरणी समन्स बजावले आहे.

सुकन्या मंडल, त्याच्या गाडीचे चालक तूफान मिड्डा आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विजय रजक यांनी २० मार्च रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहेत. त्यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.

Cattle Smuggling Case
Amruta Fadnavis News: अमृता फडणवीस शुद्ध-पवित्र, मग 1 कोटींची लाच देणारे तुमच्या स्वयंपाक घरात पोहोचले कसे ?

ममता बॅनर्जीचे निकटवर्तीय, माजी मंत्री, उद्योजक जाकिर हुसैन यांना आवश्यक कागदपत्रे घेऊन येण्यास ईडीने सांगितले आहे. पण त्यांना कधी बोलवले आहे, हे सांगण्यास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यांना समन्स बजावण्यात आलेले नाही. आयकर विभागाने गेल्या जानेवारी महिन्यात जाकिर हुसैन चौकशी केली होती, त्याच्याकडून ११ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे.

सुकन्या मंडल यांना गेल्या बुधवारी दिल्लीच्या ईडी कार्यालयात बोलवण्यात आले होते. पण त्या गैरहजर होत्या. सुकन्या मंडल यांनी ईडी कार्यालयाला मेल पाठवून हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता.

आपल्या दोन कंपन्यातील आर्थिक व्यवहाराबाबत त्यांची यापूर्वी दोनवेळा ईडीने चौकशी केली होती. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे नेता कृपामय घोष यांनी काल (गुरुवारी) ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, ते हजर राहिले नाही.

Cattle Smuggling Case
BJP Mission 2024 : "मौत का सौदागर" ते "चायवाला" ; BJP चे असे आहे २०२४ चे टार्गेट..

"जमीन द्या, रेल्वेत नोकरी मिळवा" या गैरव्यवहारात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने तेजस्वी यादव यांना दणका दिला आहे. जमीनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी मिळवा, या गैरव्यवहाराची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग(cbi) करीत आहे.

याबाबत सीबीआयने तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. या समन्सच्या विरोधात तेजस्वी यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यादव यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांना आता २५ मार्च रोजी सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी सकाळी साडेदहा वाजता उपस्थित राहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com