Rahul Gandhi and K Chandrasekhar Rao  Sarkarnama
देश

Telangana Election: 'तुम्ही ज्या शाळेत शिकला ती शाळा काँग्रेसने बांधली'; राहुल गांधींची केसीआर यांच्यावर टीका

Rahul Gandhi on K Chandrasekhar Rao : राहुल गांधींनी एका सभेत बोलताना मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले

Ganesh Thombare

Telangana News: तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आता सर्वच पक्षाने स्टार प्रचारक मैदानात उतरवले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधींनी देखील तेलंगणावर लक्ष केंद्रित केले आहे.

सध्या त्यांच्या सभा तेलंगणात होत आहेत. राहुल गांधींनी एका सभेत बोलताना मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "ज्या शाळेत तुम्ही शिकला, ती शाळा काँग्रेसने बांधली", असा टोला राहुल गांधींनी राव यांना लगावला.

निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राजकीय नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता अशाच एका सभेत बोलताना मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत काँग्रेसने तेलंगणात काय केले ? असा सवाल केला होता. आता त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर देत राहुल गांधींनी के.चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, "काँग्रेसने काय केले ? असा सवाल ते विचारत आहेत, पण आता मी त्यांना सांगतो, ज्या रस्त्यांवर के.चंद्रशेखर राव हे चालत आहेत, ते रस्ते काँग्रेसने बांधले आहेत. ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले, ती शाळा देखील काँग्रेसने बांधली आहे ", असे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, याचवेळी बोलताना पंतप्रधान मोदी आणि के.चंद्रशेखर राव यांच्यावर हल्लाबोल करत "मोदी जे बोलतात तेच चंद्रशेखर राव बोलतात. त्यामुळे संसदेमध्ये राव मोदींना मदत करतात तर राज्यामध्ये मोदी हे राव यांना मदत करतात, त्यामुळे आधी चंद्रशेखर राव यांना हरवणे त्यानंतर केंद्रात मोदींना हरवणे, अशी आपलं लक्ष्य आहे, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT