Following recommendations from the National Testing Agency, the Indian government has temporarily restricted Telegram access and disabled message editing features in India to prevent misuse during the NEET UG 2026 re-examination period. Sarkarnama
देश

Telegram Ban India : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच केंद्र सरकारचा सोशल मीडियावर स्ट्राईक; 'टेलिग्राम'वर तात्पुरती बंदी

NEET UG 2026, NTA News : परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी, हा त्यामागचा उद्देश असल्याचे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Rajanand More

NEET Re Exam 2026 : देशात नीट पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विरोधी पक्षांसह कॉक्रोच जनता पार्टीकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून आधीच परीक्षा रद्द करत २१ जूनला पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. या घडामोडी घडत असताना केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सरकारने टेलिग्राम अॅपवर तात्पुरती बंदी आणली आहे. टेलिग्रामवरूनच नीटच्या प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे आरोप समोर आल्यानंतर सरकारने फेरपरीक्षेआधी सावधगिरी म्हणून टेलिग्राम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅपवर २२ जूनपर्यंत बंदी असणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे NTA कडून स्वागत करण्यात आले आहे.

टेलिग्रामवर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्क्रीनशॉट, मुळ पेपेरचे फोटो व्हायरल झाल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. याबाबत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दोन स्वतंत्र आदेश जारी केले आहे. पहिल्या आदेशामध्ये टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

दुसऱ्या आदेशानुसार, टेलिग्रामला भारतात आधीच पोस्ट केलेले मेसेज संपादित करण्याची सुविधा ३० जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलले आहेत. याबाबत एनडीएकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पेपर लीक आणि फेरपरीक्षेच्या नावाने काही टेलिग्राम चॅनेलवरून कथितपणे नकली पेपरसाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची मागणी करण्यात आली आहे. संपादनाच्या सुविधेमुळे अॅडमिनकडून जुन्या मेसेजमध्ये बदल करून नव्या फाईल टाकल्या जाऊ शकतो. त्यामुळे परीक्षेनंतर फसवणुकीचे प्रकार होऊ शकतात, असे एनटीएने म्हटले आहे.

बंदीमुळे वापरकर्त्यांना काही काळासाठी ही सुविधा मिळणार नाही. पण केवळ परीक्षेपुरतीच ही बंदी असेल. परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी, हा त्यामागचा उद्देश असल्याचे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या २१ जूनला होणारी परीक्षा नियोजित वेळेनुसारच होईल, असेही एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पेपरफुटी टाळण्यासाठी एनटीएसह केंद्र सरकारकडूनही अन्य महत्वपूर्ण उपायोजना केल्या जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT