TMC MLA news : खासदार पतीच्या बंडाविरोधात आमदार पत्नीचा 'दुर्गा'वतार; ममता बॅनर्जींची ढाल बनल्या, फोडण्याचे प्रयत्न होऊनही सोडली नाही साथ

Sudip Bandyopadhyay, Nayna Bandyopadhyay : सुदीप बंदोपाध्याय यांनीही आमदार पत्नी नयना या टीएमसीमध्येच राहणार असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केले.
Nayna Bandyopadhyay
Nayna BandyopadhyaySarkarnama
Published on
Updated on

Trinamool Congress News : देशाच्या राजकारणातील एक दुर्मिळ घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या खासदारांनी एनडीएला पाठिंबाही जाहीर केला आहे. मात्र, या खासदारांपैकी एका खासदाराच्या आमदार पत्नीने मात्र पतीच्या बंडाविरोधात शड्डू ठोकला आहे.

कोण आहेत या आमदार?

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनीही ममता बॅनर्जींविरोधात बंड केले आहे. ते ममतादीदींना सोडणार नाही, असा दावा पक्षाच्या अनेक नेत्यांनी सुरूवातीला केला होता. त्यांच्या बंडामुळे अनेकांना धक्का बसला. बंदोपाध्याय यांचे हे बंड त्यांच्या पत्नी नयना बंदोपाध्याय यांच्याही जिव्हारी लागले आहे. सुदीप बंदोपाध्याय हे कोलकाता उत्तर मतदारसंघाचे खासदार आहे. तर त्यांच्या पत्नी नयना या चौरंगी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

नयना बंदोपाध्याय यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, सुदीप बंदोपाध्याय हे उत्तर कोलकाताचे खासदार आहेत. त्यांनी बंड केल्यानंतर पत्नी नयना याही टीएमसीपासून दूर जातील, अशी चर्चा होती. पण आमदार नयना यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Nayna Bandyopadhyay
Bhagwant Mann Video : मुख्यमंत्र्यांच्या हातात दारूचा ग्लास अन्..! अकाल तख्तने भगवंत मान यांना धरले दोषी, निवडणुकीच्या तोंडावर धक्का

नयना यांनी सांगितले की, पक्ष सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ममता बॅनर्जी यांनी आपल्याला सोडले तरी आपण पक्ष सोडू शकत नाही. मी दीदीला आपली दुर्गा मानले आहे, त्यांना सोडू कसे सोडू? पक्षातील काही सहकाऱ्यांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका केली. याबाबत मी पक्षप्रमुखांकडे तक्रारही केली असल्याचे नयना यांनी स्पष्ट केले.

Nayna Bandyopadhyay
TMC Rebel MPs : ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का; 20 बंडखोर खासदारांचा गट NCPI मध्ये विलीन, बिर्लांच्या भेटीनंतर घोषणा

पत्नीला समजविण्याचा प्रयत्न

सुदीप बंदोपाध्याय यांनीही आमदार पत्नी नयना या टीएमसीमध्येच राहणार असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केले. त्यांनी सांगितले की, 'आपल्या पत्नीला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला. पण त्यांनी तसा निर्णय घेतला नाही. त्या टीएमसीमध्येच आहेत.' दरम्यान, नयना यांच्याविषयी बोलताना टीएमसीचे आमदार कुणाल घोष म्हणाले, दीदींना सोडून जाणार नाही, अशी शपथ आम्ही दोघांनी घेतली आहे. आता त्या दीदीसोबतच राहणार की नाही, हे पाहावे लागेल. त्यांचे पती सोडून गेले आहेत. ते पक्ष बदलण्यात तरबेज आहेत. नयना या आमच्यासोबतच राहतील, याची आशा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com