Terrorist Abu Katal sarkarnama
देश

Terrorist Abu Katal : भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा! यात्रेकरूंच्या बसवर हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानातच ठार

Lashkar-e-Taiba : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू कटाल सिंधी याचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आला आहे. तो हाफिज सईदचा जवळचा सहकारी होता. तर यात्रेकरूंच्या बसवर हल्ला झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता.

Aslam Shanedivan

Navi Delhi : भारताचा मोठा शत्रू आणि कुख्यात दहशतवादी अबु कताल सिंघी याला ठार मारण्यात आले आहे. अबु कतालची हत्या काही अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी (ता.15) रात्री केली. लष्कर-ए-तैयबाचा हा दहशतवादी असून तो यात्रेकरूंच्या बसवर हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. त्याचा पाकिस्तानात ठार मारण्यात आले आहे.

9 जून रोजी रियासी येथील शिव-खोडी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला झाला होता. याच हल्लाचा मास्टरमाइंड अबू कटाल सिंधी होता. तसेच तो एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता. तर जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये अबू कटालच्या भूमिकेबद्दल लष्करासह अनेक सुरक्षा एजन्सी त्याच्यावर लक्ष ठेवून होत्या.

या दरम्यान अबू कटाल सिंधी या पाकिस्तान लष्कर-ए-तैयबाचा मोठा दहशतवादी हाफिज सईदच्या खूप जवळचा असणाऱ्या दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे. हत्या काही अज्ञांतांनी शनिवारी त्याची हत्या केली.

2023 च्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी, जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील धांगरी गावात 7 जणांच्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एनआयएने अबू कटाल सिंधी याला मुख्य आरोपी बनवले होते. एनआयएच्या आरोपपत्रानुसार, पाकिस्तानात बसलेल्या या लष्कर हँडलरने संपूर्ण हल्ल्याची योजना आखली होती आणि तो करण्यासाठी दहशतवाद्यांची भरती केली होती.

पाकिस्तानमध्येच भारतद्वेष्ट्यांचा खात्मा

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये अनेक कुख्यात भारतविरोधी दहशतवाद्यांची हत्या केली जातेय. यामध्ये पहिले नाव रियाज अहमद उर्फ ​​अबू कासिमचे आहे. लष्कराचा हा टॉप कमांडर कराचीमध्ये मारला गेला. यानंतर, फेब्रुवारी 2023 मध्ये काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा मास्टरमाइंड बशीर अहमद पीर पाकिस्तानमध्ये मारला गेला.

तर आता अलिकडेच रफिक नायकूची इस्लामाबादमध्ये हत्या करण्यात आली होती. रफिक नायकू हिजबुल मुजाहिदीनचा एक मोठा दहशतवादी होता. यानंतर आता लष्कर-ए-तैयबाचा टॉप दहशतवादी अबू कताल सिंधी याची काल रात्री हत्या करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT