Thalapathy Vijay Sarkarnama
देश

Thalapathy Vijay : तामिळनाडूत निवडणुकीच्या रिंगणात सुपरस्टारची एन्ट्री; थलपती विजयचा पक्ष विधानसभा लढवणार!

Mayur Ratnaparkhe

Thalapathy Vijay party Tamilaga Vetri Kazhagam News : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते थलपती विजय यांनी लोकसभा निवडणुकीआधी फेब्रुवारी 2024 रोजी तमिलगा वेत्री कजगम नामाक पार्टीची घोषणा केली होती. आता निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या त्यांच्या पार्टीला मान्यता दिली आहे. अभिनेते विजय यांनी रविवारी याबाबत स्वत: घोषणा केली.

साउथ सुपरस्टार थलपती विजय यांनी म्हटले आहे की, आम्ही 2 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी अर्ज केला होता. आमच्या याचिकेच्या कायदेशीर तपासणीनंतर, देशाच्या निवडणूक आयोगाने आमच्या तमिलगा वेत्री कझगम पार्टीची नोंदणी केली आहे आणि आमच्या पक्षाला निवडणुकीच्या राजकारणात भाग घेण्याची परवानगी दिली आहे.

थलपती यांचे तामिळनाडू(Tamil Nadu), केरळ आणि अन्य दक्षिणी राज्यांमध्ये अधिक चाहत्ये आहेत. फेब्रुवारीत राजकीय पक्षाची स्थापना करताना, त्यांनी म्हटले होते की, त्यांची संघटना सामाजिक न्यायाच्या मार्गावर चलणार. त्यांनी म्हटले होते की, पक्ष जात आणि भ्रष्ट्राचारमुक्त राहूून काम करेल.

अभिनेता थलपती विजयने(Thalapathy Vijay) दोन आठवडे आधीच आपला पक्ष टीवीकेचा झेंडा आणि चिन्ह जारी केले होते. त्यांच्या पक्षाच्या झेंड्याच्या वर आणि खालच्या भागात लाल आणि मरून रंग आणि मध्यभागी पिवळा रंग आहे, ज्यावर दोन हत्ती आणि एक वाघईच्या फूल आहे. जे विजयाचे प्रतीक आहे. थलपती विजयने म्हटले की ते लवकर पक्ष सदस्यांसोबत राज्यस्तरीय बैठक करतील. जिथे पक्षाच्या विचारधारेच्या प्रचार अन् प्रसारासाठी रणनीती ठरवली जाईल.

पक्षाच्या लॉन्चिंगवेळी थलपती विजय यांनी म्हटले होते की, पक्षाचे लक्ष्य आगामी 2026ची विधानसभा निवडणूक लढणे आणि जिंकणे आहे. खरंतर टीवीकेची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आधी केली गेली होती. परंतु तेव्हा पक्षाने निवडणूक लढवली नाही आणि कोणत्या पक्षाला पाठिंबाही दिला नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT