TVK Chief Vijay Unveils Party Flag : हत्तींवर स्वार होत सुपरस्टार थलपती विजय देणार स्टॅलिन यांना टक्कर; झेंडा फडकावत फुंकले निवडणुकीचे रणशिंग

Tamilaga Vettri Kazhagam (TVK) Chief Vijay : तामिळ अभिनेते आणि तमिलगा वेत्री कळघम (TVK) प्रमुख थलपती विजय यांनी चेन्नई येथील पक्ष कार्यालयात पक्षाच्या ध्वजाचे अनावरण केले.
Tamilaga Vettri Kazhagam (TVK) chief Vijay
Tamilaga Vettri Kazhagam (TVK) chief VijaySarkarnama
Published on
Updated on

Tamilaga Vettri Kazhagam (TVK) Chief Vijay : आपल्या अभिनयाने चित्रपट सृष्टीतून मोठी प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता थलापती विजय यांनी लोकसभा निवडणुकांआधी राजकारणात प्रवेश करत तमिलगा वेत्री कळघम (TVK) या पक्षाची स्थापना केली.

आज विजय यांनी चेन्नई येथील पक्ष कार्यालयात पक्षाच्या ध्वजाचे अनावरण केले. यावेळी विजय म्हणाले, 'मला माहित आहे की तुम्ही सर्व आमच्या पहिल्या राज्य परिषदेची वाट पाहत आहात. त्यासाठी तयारी सुरू असून लवकरच मी त्याची घोषणा करेन.

त्याआधी आज मी आमच्या पक्षाच्या ध्वजाचे अनावरण केले आहे. मला खूप अभिमान वाटतो. तामिळनाडूच्या विकासासाठी आम्ही एकत्र काम करू. यावेळी विजय यांचे वडील आणि आई देखील पक्ष कार्यालयात उपस्थित होते.

विजय यांनी त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर पक्षाचा झेंडा फडकावला. 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांवर (Vidhansabha Election) लक्ष केंद्रित केल्यामुळे ध्वजाचे अनावरण विजयच्या राजकीय प्रवासातील पहिले मोठे पाऊल मानले जात आहे.

पक्षाच्या ध्वजाचे अनावरण करण्यापूर्वी अभिनेते-राजकारणी विजय यांनी शपथ वाचून दाखवली. शपथपत्रात विजय यांनी लिहिले की, 'आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले आणि बलिदान दिले त्या सैनिकांचे आम्ही नेहमीच कौतुक करू.

तमिळ भूमीतील आपल्या लोकांच्या हक्कांसाठी अथकपणे लढणाऱ्या त्या अगणित सैनिकांचे योगदान आम्ही सदैव लक्षात ठेवू. जात, धर्म, लिंग, जन्मस्थान या नावावरचा भेदभाव मी दूर करीन. मी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करीन आणि सर्वांना समान संधी आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन. मी शपथ घेतो की मी सर्व प्राणिमात्रांसाठी समानतेचे तत्व कायम ठेवीन.'

Tamilaga Vettri Kazhagam (TVK) chief Vijay
Rahul Gandhi News : 'पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारनंतर आता महाराष्ट्रातही..' ; बदलापूरच्या घटनेवर राहुल गांधींचा संताप!

याआधी बुधवारी, तामिळमध्ये जारी केलेल्या एका प्रेस स्टेटमेंटमध्ये, विजय यांनी सांगितले की लोकांसाठी काम करणे हा एक मोठा आशीर्वाद आहे. रोज नवी दिशा आणि नव्या ताकदीने काम करायचे असेल तर ते खूप मोठे आशीर्वाद मिळतात.

22 ऑगस्ट 2024 हा दिवस आहे जो देव आणि निसर्गाने आपल्याला आशीर्वाद म्हणून दिला आहे. याच दिवशी आमच्या तामिळनाडू (Tamil Nadu) विजय क्लबचे मुख्य प्रतीक असलेल्या ध्वजाची ओळख होईल.

Tamilaga Vettri Kazhagam (TVK) chief Vijay
Punishment in Rape Cases : कोलकातामधील बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी अन्य देशांमध्ये आहेत भयंकर शिक्षा!

लवकरच राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार

विजय यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये तमिझगा वेत्री कळघम (TVK) ची स्थापना करण्याची घोषणा केली होती. त्याचा शेवटचा चित्रपट प्रकल्प 'थलापती 69' पूर्ण केल्यानंतर, ते फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे.

या चित्रपटाचं काम पूर्ण झालं की विजय पूर्णपणे राजकारणात सक्रिय होणार आहेत. त्यासाठी त्यांनी पुढील दोन वर्षांत TVK च्या तळागाळातील पायाभूत सुविधा तयार करण्याचे वचन दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com