Manipur Violence : Sarkarnama
देश

Manipur Violence : मणिपूर हिंसाचारावरून भाजप आमदाराचा थेट मोदींनाच घरचा आहेर

Manipur News : मी अजूनही परिस्थितीचे गांभीर्य सांगण्याच्या संधीची वाट पाहत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Manipur News : मणिपूरमधील हिंसाचारावरुन मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आता मणिपूरचे भाजपचे आमदार हाओकीप यांनी निशाणा साधला आहे. इतकेच नव्हे तर, आपण मणिपूरमधील परिस्थितीवर बोलण्यासाठी पंतप्रधांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण तीही आपल्याला दिली गेली नाही. याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या आठवड्यात मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधानांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर भाष्य करत या घटनेची निंदा केली. पण कुकी-झोमी समुदायाचे असलेल्या पाओलिनलाल हाओकीप यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत थेट पंतप्रधानांवरच निशाणा साधला आहे.

हाओकीप काय म्हणाले?

"ते 79 दिवस विसरून जा, पण एवढ्या मोठ्या हिंसाचारावर प्रतिक्रिया देण्यासाठी एक आठवड्याचा कालावधीही खूप आहे. पंतप्रधान मोदींचे प्राधान्यक्रम पूर्णपणे चुकीचे असल्याचंही हाओकिप यांनी म्हटलं आहे.आंतरराष्ट्रीय संबंधांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, परंतु जिथे लोक मारले जात आहेत ते प्रकरण सोडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. पण देशात माणूसकीच शिल्लक राहिली नाही.

पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी आपण मणिपूरची गंभीर परिस्थिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती, पण मला प्रतिसाद मिळाला नाही.मी अजूनही परिस्थितीचे गांभीर्य सांगण्याच्या संधीची वाट पाहत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हाओकीप यांचे मणिपूर सरकारवर आरोप

मैतेई समुदायाने चिन-कुकी-मिझो-झोमी या डोंगराळ भागातील आदिवासींविरोधात सुरू केलेल्या हिंचाचाराने राज्यात एक दरी निर्माण झाली आहे. पण सध्याचे मणिपूरचे सध्याचे सरकारही त्यावर मौन बाळगून अप्रत्यक्षरित्या या हिंसाचाराला समर्थन देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हाओकिप यांनी राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या चार घटनांची यादी केली असून, मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना राज्यातील अत्याचाराकडे लक्ष वेधण्यासाठी त्या घटनांच्या व्हिडिओची गरज आहे का? "राज्य सरकार अशा अमानुष हिंसाचाराविरोधात कारवाई का करत नाही, असा सवाल हाओकिप यांनी उपस्थित केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT