Sharad Pawar Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मीच आहे. जर कुणी म्हणत असेल की ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर मला काही अडचण नाही, ते म्हणू शकतात, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. केंद्रीय निवडणूक आयोगात आम्ही आमची भूमिका मांडू, असेही पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी आज (ता.6 जुलै) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीनीची बैठक दिल्लीमध्ये बोलावली होती. या बैठकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार म्हणाले, ज्यांना पदावरून काढले त्यांना सोडून सर्व लोक बैठकीला उपस्थित होते. पक्षाला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली.
तसेच बैठकीमध्ये आठ ठराव करण्यात आले आहेत. आमचा विश्वास निवडणूक आयोगावर आहे. आम्हाला जे काही सांगायचे आहे, ते निवडणूक आयोगासमोर सांगू. पक्षातील या परिस्थितीसंदर्भात निवडणूक आयोग निर्णय घेईल. कुणाकडे किती संख्याबळ आहे, हे वेळ येईल तेव्हा दाखवून देऊ, असे स्पष्ट केले.
लोकांचे समर्थन कुणाला आहे, ते मला माहिती आहे. मी एक दौरा केला आहे, त्यामध्ये लोकांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व ईडी, आणि सीबीआयचा वापर करत आहे. निवडणुकीला आठ दहा महिने बाकी आहेत. त्यानंतर निवडणूक होईल. त्यावेळी देशामध्ये परिवर्तन होईल, असेही पवार यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही केंद्रीय यंत्रणांच्यासंदर्भात निर्णय घेऊ, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संदर्भात पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार आहे का, असे विचारले असता पवार म्हणाले, या विषयी मला काही माहिती नाही. मात्र, तुमच्याकडे काही माहिती असेल तर मला खाजगीत सांगा, अशी मिश्किल टिप्पणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.