Sharad Pawar News : राष्ट्रवादीवर अजित पवारांचा दावा; पण कार्यकारी समितीवर शरद पवारांचे वर्चस्व

NCP News : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्ममंत्री पदाची शपथ घेतली.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pawar vs Pawar News : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्ममंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. या फुटीनंतर अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा सांगितला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला.

अजित पवार यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी आज (ता.6 जुलै) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीनीची बैठक दिल्लीमध्ये बोलावली आहे. अजित पवार यांच्याकडे आमदार जास्त असले तरी पक्षाच्या खासदारांचा शरद पवार यांनाच पाठिंबा आहे. तसेच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीनीमध्येही शरद पवार (Sharad Pawar) यांचेच वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे.

Sharad Pawar News
Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येणार? अभिजित पानसेंनी घेतली संजय राऊतांची भेट; चर्चांना उधाण !

या समितीमध्ये एकूण ३० जणांचा समावेश आहे. यापैकी अजित पवार गटात गेलेल्या चार जणांची नावे वगळली तर सर्वजण शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून आहेत. यामध्ये जयंत पाटील, खासदार फौजिया खान, खासदार मोहम्मद फैजल, त्याच बरोबर नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, खासदार वंदना चव्हाण, अमोल कोल्हे, धीरज शर्मा, सोनिया दुहन, यांच्यासह इतर राज्यातील काहींचा समावेश आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी व कार्यकारी समितीतून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या खासदार प्रफुल्ल पटेल यांचे नाव आधीच वगळण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा म्हणून नोंद असल्याची माहिती मिळत आहे.

Sharad Pawar News
IAS Transfers News : 'पीएमपीएमएल'चे एमडी बकोरियांची दहा महिन्यांतच उचलबांगडी; पीएमपी कशी स्थिरावणार?

शरद पवार यांच्या गटाची दिल्लीमध्ये बैठक सुरु आहे. यामध्ये काय घडामोडी घडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, शरद पवार यांनी बोलावलेली बैठक ही बैकायदेशीर असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.