Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येणार? अभिजित पानसेंनी घेतली संजय राऊतांची भेट; चर्चांना उधाण !

Raj-Uddhav Thackeray Alliance: राष्ट्रवादीनंतर आता ठाकरे गट आणि मनसेमध्ये हालचाली वाढल्या...
Raj-Uddhav Thackeray
Raj-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Political News: राज्याच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर आता राष्ट्रवादीमध्येही फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट भाजपसोबत सत्तेत सामिल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.

यानंतर आता ठाकरे गट आणि मनसेमध्ये हालचाली वाढल्या आहेत. मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raj-Uddhav Thackeray
IAS Transfers News : 'पीएमपीएमएल'चे एमडी बकोरियांची दहा महिन्यांतच उचलबांगडी; पीएमपी कशी स्थिरावणार?

मनसे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची 'सामना'च्या कार्यालयात भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान मनसेकडून युतीचा प्रस्ताव दिला असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर या भेटीनंतर अभिजित पानसे हे शिवतीर्थावरही दाखल झाले होते. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

संजय राऊतांच्या भेटीबाबत पानसे काय म्हणाले?

संजय राऊत यांच्या भेटीबाबत अभिजित पानसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मी खासगी कामानिमित्त संजय राऊत यांची भेट घेतली. त्यासाठी सामना कार्यालयात गेलो होतो. मात्र, आमची युतीसंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही", असं म्हणत अभिजित पानसे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

Raj-Uddhav Thackeray
Ahmednagar NCP News : नगर जिल्ह्यात शरद पवारांच्या पाठीशी चार तर अजितदादांच्या पाठीशी केवळ दोन आमदार !

संदीप देशपांडे नेमकी काय म्हणाले?

संजय राऊत आणि अभिजित पानसे यांच्या भेटीबाबत संदीप देशपांडे यांनी सांगितलं की, "अभिजित पानसे यांनी काही कामानिमित्त संजय राऊतांची भेट घेतली असेल. मात्र, मनसेकडून असा कोणता प्रस्ताव दिला गेला असेल, तर याची मला कल्पना नाही. याची माहिती स्वत: अभिजित पानसे हेच शकतील ", असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com