US army plane arrives in Amritsar : अमेरिकेमधून 112 अनिवासी भारतीयांना घेऊन तिसरे विमान अमृतसर विमानतळावर रविवारी रात्री उशीरा पोहचले. प्राप्त माहितीनुसार यामधील 112 भारतीयांमध्ये पंजाब - 31, हरियाणा -44, गुजरात - 33 जणांसह उर्वरीत अन्य राज्यांमधील आहेत. या सर्वांवर अमेरिकेत बेकायदेशीररित्या वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली, अमेरिका सरकारकडून कारवाई केली गेली आहे.
अमेरिकेने(America) 5 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा 104 अनिवासी भारतीयांना भारतात पाठवले होते. त्यावेळी त्या भारतीयांच्या हातात हातकडी आणि पायत बेड्या देखील बांधल्या गेल्या होत्या. तर आतापर्यंत 332 अनिवासी भारतीय मायदेशी आले आहेत.
शनिवारी रात्री उशीरा अमेरिकेतून 116 निर्वासितांना घेऊन एक अमेरिकन सैन्य विमान अमृतसर एअरपोर्टवर पोहचले होते. शनिवारी रात्री जवळपास 11.30 वाजता विमानतळावर उतरलेल्या सी-17 विमानाच्या माध्यमातून निर्वासित भारतीयांच्या दुसऱ्या ग्रुपला भारतात आणले गेले.
यामध्ये 65 जण पंजाबचे, हरिणातील 33जण, आठ जण गुजरातमधील तर प्रत्येकी दोन जण उत्तर प्रदेश, गोवा(Goa), महाराष्ट्र आणि रास्थानातील होते. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक एक जणाचा समावेश होता. अमृतसरला पोहचल्यानंतर त्यांना भोजन उपलब्ध करून दिले गेले. ज्यामुळे एवढ्या दूरच्या प्रवासानंतर त्यांना जरा हायसे वाटले. प्राप्त माहितीनुसार दुसऱ्या समूहात बहुतांश जणांचे वय 18 ते 30 यादरम्यान होते.
याशिवाय शनिवारी रात्री उशीरा भारतात पोहचलेल्या अनिवासी भारतीयांनी अमेरिकेपर्यंतच्या आपल्या प्रवासातील त्यांना आलेल्या अडचणी देखील सांगितल्या. पंजाबमधील एनआरआय प्रकरणांचे मंत्री कुलदीप सिंह धालीवाल आणि उर्जा मंत्री हरभजन सिंह यांनी विमानतळावर काही अनिवासी भारतीयांची भेट घेतली आणि विचारपूस केली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.