Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi Press Conference : ...म्हणून जास्त शिक्षेचा विचार; राहुल गांधींनी सांगितलं कारस्थानाचं कारण

Congress Party : प्रत्येक वाक्य विचार करूनच बोलतो म्हणत गांधींचा माफी मागण्यास नकार

सरकारनामा ब्युरो

Rahul Gandhi Latest News : लोकसभेत यापूर्वी मोदी सरकारला वारंवार आदाणी शेल कंपनीत अचानाक वीस हजार कोटी कसे वाढले? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम आदाणींचे नाते काय? याबाबत वारंवार प्रश्न विचारले आहेत. त्याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. आता यापुढेही आदाणींच्या वाढलेल्या संपत्तीबाबत बोलणार आहे, याची माहिती मोदी सरकारला होती. त्यातूनच माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. मात्र मी खासदार असो वा नसो, काही फरक पडत नाही. लोकशाहीसाठी शेवटपर्यंत लढत राहणार, असा इशारा काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांनी भाजपला दिला आहे.

मोदी अडनावावरुन मागासवर्गीय समाजाचा अपमान केल्यावरुन सूरत न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकप्रतीनिधी कायद्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. यावर राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. भाजप आदाणींच्या वाढलेल्या संपत्तीवरून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना बगल देण्यासाठी अनेक मार्ग अवलंबत आहे. त्यासाठी कधी ओबीसी, देशविरोधी, मानहानी असे सर्व काही मुद्दे ते उकरून काढत आहेत. भाजपच्या या कटकारस्थानास आम्ही बळी पडणार नसल्याचा इशारा गांधींनी यावेळी दिला आहे.

राहुल गांधी म्हणाले, "माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विरोध नसून आदाणींना आहे. आदाणींच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रुपये कुठून आले? ते कुणाचे पैसे आहेत, त्याची चौकशी करावी. ते नरेंद्र मोदींनी मिळवून दिले असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी. दुसऱ्या कुणाचे असतील तर त्याला तुरुंगात टाकावे. आदाणी भ्रष्ट व्यक्ती असल्याचे जनतेला माहिती आहे. त्या व्यक्तीला पंतप्रधान का वाचवितात? भाजप आदणींना संरक्षण का देतेय? भाजप म्हणते आदाणींवर आक्रमण म्हणजे देशावर हल्ला. त्यांच्यावर बोलत मोदी सरकारमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा देण्याचाच सरकारचा विचार आहे. पण त्याचा मला काही फरक पडणार नाही."

लक्षद्वीपचे खासदार मोहमंद फैजल (Mohammad Faizal) यांनी शिक्षेनंतर आपली खासदारकी वाचविली होती. तसे काही प्रयत्न करणार का, असे विचारले असता राहुल गांधी म्हणाले, "मी आशेवर जगत नाही. मी तुरुगांत जाण्यास तयार आहे. मला खासदारकी मिळाली तर लोकसभेतून, नाही मिळाली तर बाहेरून लोकशाही वाचविण्यासाठी काम करणार आहे. माझ्यापुढे एकच मार्ग आहे तो म्हणजे लोकशाहीसाठी शेवटपर्यंत लढणे. त्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे."

मोदी अडनावावर बोलल्याने खासदारकी रद्द झाली आहे. त्यामुळे तुमच्या वाक्याबद्दल खंत वाटते का? असे विचारले असता गांधी म्हणाले, आता हे प्रकरण न्यायालयीन आहे, त्यामुळे जास्त बोलणे ठीक नाही. मात्र मी प्रत्येक वाक्य विचार करूनच बोलतो."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT