Rahul Gandhi Controversial Speech : माफी मागायला मी सावरकर आहे का? राहुल गांधींनी पुन्हा भाजपला डिवचलं

Congress Party News : लोकशाहीसाठी शेवटपर्यंत लढणार
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi Press Conference : गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून नरेंद्र मोदी आणि आदाणी यांचे चांगले संबंध आहेत. आता आदाणींच्या शेल कंपनीत अचानक २० हजार कोटी कुठून आले, याबाबत प्रश्न विचारले तर विरोधकांसह देशाचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. मी ओबीसी समाजाचा आपमान केला नाही. माझा प्रश्न भारताला लुटून परदेशात पळून गेलेल्या लोकांसाठी होता. तसेच आदाणींची संपत्ती वाढविण्यास मदत करणाऱ्या सरकारला होता. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न येत नाही. माफी मागायला मी सावरकर नाही. मी राहुल गांधी आहे, असा पुनरुच्चार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला.

कर्नाटकमधील (Karnataka) कोलार येथे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते, असा राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर गांधींनी संपूर्ण मोदी अडनाव असलेल्या लोकांची मानहानी केल्याचा आरोप भाजपने (BJP) केला. त्यानंतर तक्रार दाखल झाल्याने संबंधित खटला सूरत न्यायालयात पूर्ण झाला. न्यायालयाने गुरुवारी (ता. २३) राहुल गांधींना मानहानीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा केली. ही शिक्षा झाल्यानंतर शुक्रवारी (ता. २४) लोकप्रतिनिधी कायद्यानुसार राहुल यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द केली. त्यानंतर आज राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.

Rahul Gandhi
Rahul Gandhi News : "तुम्ही ओबीसी समाजाचा अपमान केला का?" ; राहुल गांधी म्हणाले...

दरम्यान, मोदी अडनावाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी माफी मागावी आणि प्रकरणावर पडदा टाकावा, अशी मागणी भाजप सातत्याने करीत आहे. त्याबाबत आज मोदी अडनावावरून केलेल्या वक्तव्याबाबत खंत वाटत आहे का? भाजपच्या मागणीनुसार तुम्ही माफी मागणार का, असे प्रश्न विचारण्यात आले.

त्यावर राहुल गांधी म्हणाले, "मी राहुल गांधी आहे. मी क्रांतीकारी कुटुंबातून येतो. माफी मागायला मी काय सावरकर आहे का? देशाचा पैसा लुटून पळालेले, आदानींना मदत करणाऱ्यांवर मी बोललो आहे. भारत जोडो यात्रेत सर्व ठिकाणी देशात बंधुभाव वाढला पाहिजे. कोणत्याही समाजात, धर्मात तेढ नको, असेच बोललो आहे. त्यामुळे मी ओबीसींचा अपमान कसा करेन."

Rahul Gandhi
Rahul Gandhi on Disqualification: खासदारकी रद्द का केली? राहुल गांधींनी सांगितलं लोकसभेत काय घडलं...

राहुल गांधींनी सावरकरांवरून पुन्हा एकदा भाजपवर निशाना साधला आहे. यापूर्वी राहुल गांधींनी ट्वीट करून 'सावरकर समझा क्या... नाम- राहुल गांधी है' असे वाक्य पोस्ट केले होते. त्यासोबत त्यांचा वाहनातील फोटो शेअर केला होता. त्यानंतरही भाजपच्या गोटातून राहुल गांधींचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. आज पुन्हा त्यांनी माफी मागायला सावरकर आहे का, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस (Congress) पक्षांत आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com