Mamata Banerjee party facing setback in municipalities Sarkarnama
देश

TMC Crisis West Bengal : पराभवानंतर ममता बॅनर्जींच्या पक्षात खळबळ; राज्याची सत्ता गेल्यानंतर नगरपालिकांमध्येही जोरदार झटका

Trinamool Congress municipal crisis latest news: तृणमूल काँग्रेसची अनेक नगरपालिकांमध्ये सत्ता आहे. राजीनाम्याच्या लाटेमुळे ममतांचे नगरपालिकांमधील गडही ढासळू लागले आहेत.

Rajanand More

West Bengal political developments after election: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. निकालाच्या दिवसापासून अनेक नेत्यांनी उघडपणे ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर आरोप सुरू केले होते. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी कामकाजाला सुरूवात केल्यानंतर अनेकांनी कारवाईचा धसका घेतला आहे.

तृणमूल काँग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये अस्थिरता वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत विविध नगरपालिकांमधील तब्बल १०० हून अधिक नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. त्यामध्ये आणखी भरच पडत चालली आहे. मागील १५ वर्षांपासून तृणमूलचे शहरांमध्ये स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार झाले होते. या राजीनाम्यांमुळे त्याला हादरा बसल्याचे सांगितले जात आहे.

कुठे बसले हादरे?

तृणमूलला सर्वात मोठा हादरा भातपारा नगरपालिकेत बसला आहे. नगराध्यक्ष रेबा राहा यांच्यासह ३५ पैकी ३० नगरसेवकांनी शुक्रवारी राजीनामा दिला आहे. हलीसहर नगरपालिकेतील २३ पैकी १६ तर कांचापारामधील १४ नगरसेवकांनी पद सोडले आहे. गरुललिया नगरपालिकेतील १८, उत्तर बराकपोरमधील १५, कोनताईमधील १४ तर डायमंड हार्बर नगरपालिकेतील आठ नगरसेवकांनीही पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

तृणमूल काँग्रेसची अनेक नगरपालिकांमध्ये सत्ता आहे. राजीनाम्याच्या लाटेमुळे ममतांचे नगरपालिकांमधील गडही ढासळू लागले आहेत. राजीनामा दिलेल्या अनेक नगरसेवकांनी वैयक्तिक किंवा पक्षांतर्गत कारण सांगितले आहे. काही नगरसेवकांकडून कारवाईची भीती असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

भाजपची सत्ता आल्यानंतर काही नगरसेवक व नगराध्यक्षांना भ्रष्टाचार तसेच मतदारांना धमकावल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. त्याचाच धसका अनेक नगरसेवकांनी घेतल्याचे समोर आले आहे. बिधाननगरमधील दोन तर कुचबिहारमधील एका नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. तृणमूलचा गड असलेल्या कोलकाता महानगरपालिकेतही पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT