Trinamool Congress exit Goa : ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्याच्या राजकारणातून बाहेर पडणार, म्हणजेच यापुढे पक्ष गोव्यातून निवडणूक लढणार नाही, अशा चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
कारण, गोव्यातील आगामी निवडणुकांबाबत पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे. "तृणमूल काँग्रेस पक्ष(TMC) गोव्यातून जाणार या केवळ अफवा आहेत", असे तृणमूलचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुका(Vidhan Sabha Election) देखील पक्ष लढवणार असून, पक्षाने तळागाळातून काम करण्यास सुरुवात केल्याचे डिमेलो म्हणाले. तसेच पक्ष राज्यातून बाहेर जाणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. पण, त्यात तथ्य नसल्याचे डिमेलो यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे सह संयोजक मारीयानो रॉड्रिग्ज देखील उपस्थित होते.
तसेच, गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला काम करण्यासाठी फार कमी वेळ मिळाला तरी देखील आम्ही आठ टक्के मते घेतली. पक्ष तेव्हापासून काम करत आहे. येत्या काळात होणाऱ्या जिल्हा पंचायत आणि त्यानंतरच्या विधनासभा निवडणूक देखील आम्ही लढवू. दरम्यान, युतीबाबत राष्ट्रीय नेते निर्णय घेतील, असे डिमेलो यांनी स्पष्ट केले.
विशेष बाब म्हणजे तृणमूल काँग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ४७.५४ कोटी रुपये खर्च केले होते. पण, त्याबदल्यात पक्षाला एकही उमेवाद निवडून आणता आला नाही. या निवडणुकीत पक्षाने २३ उमेदवार उभे केले होते. याच निवडणुकीत भाजपने(BJP) मात्र १७.७५ कोटी खर्च करत २० आमदार निवडून आणले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.