
Beef export from India : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्य्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. गोव्यात असणाऱ्या मीट कॉम्पलेक्समधून इराकला गोमांस पाठवलं जात असल्याची माहिती देत, हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) म्हणाले, भाजप केवळ निवडणुकी पुरतं हिदुत्व वापरतं आणि नंतर हिंदुंना फेकून देतं. भाजपची ही दुटप्पी भूमिका जगजाहीर आहे. गोव्यात असणाऱ्या मीट कॉम्पलेक्समधून मध्य आशियातील देशांना गोमांस पाठवले जात आहे. इराकला गोमांस पाठवण्यात आले आणि भाजप आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?
गोव्यातून नुकेतच इराकला २८.५ टन गोमांस जहाजाद्वारे निर्यात करण्यात आले. गोव्यात कत्तलीसाठी गुरांची कमतरता असताना शेजारी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून जनावरं आयात करुन गोमांस निर्यात केली जात आहे. गोवा मीट कॉम्पलेक्समधून गोमांस निर्यात केली जात आहे. मीट कॉम्पलेक्समधून बहरीन, कुवेत, संयुक्त अरब आमिरात, इराक यासारख्या देशातून गोमांसाची मागणी केली जात आहे. यावरुनच आदित्य ठाकरे यांनी भाजपवर(BJP) निशाणा साधला.
याशिवाय, ''एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाचे आमदार सदा सरवणकरांनी गणपती मिरवणुकीत बंदूक रोखली होती. पोलिस स्थानकात जाऊन त्यांनी गोळी चालवली. तत्कालिन गृहमंत्री गोळी कोणी चालवली हे आम्हाला माहिती नाही, असं सांगतात. हिंदुवर बंदूक रोखणाऱ्या सरवणकरांवर युएपीएसारखा कायदा लागू करायला हवा होता. मात्र स्वत:ला हिंदू सांगणाऱ्या भाजप सरकारने याच सरवणकरांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष केलं.'', असे आदित्य ठाकरे म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.